आदित्य ठाकरेंना उदय सामंतांचे प्रत्युत्तर; ‘गद्दारी नव्हे धाडस’

उद्योगमंत्री उदय सामंत यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रत्नागिरीमध्ये आदित्य ठाकरेंनी शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून सभा घेतली. यावेळी त्यांनी शिंदे समर्थकांचा 'गद्दार' असा उल्लेख केला. त्यावरून उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले.

    रत्नागिरी : शिवसेनेमध्ये (Shivsena) उभी फूट पडली आहे. त्यानंतर ठाकरे समर्थकांकडून शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांचा गद्दार असा उल्लेख केला जात आहे. एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) बंडानंतर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिवसंवाद यात्रा (Shivsanwad Yatra) सुरू केली आहे. यावेळी ते रत्नागिरी (Ratnagiri) दौऱ्यावर असताना ‘गद्दार’ असा उल्लेख केला. त्यावरुन आता उदय सामंत (Uday Samant) यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.

    उद्योगमंत्री उदय सामंत यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रत्नागिरीमध्ये आदित्य ठाकरेंनी शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून सभा घेतली. यावेळी त्यांनी शिंदे समर्थकांचा ‘गद्दार’ असा उल्लेख केला. त्यावरून उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले. आमच्या मतदारसंघात येऊन आम्हाला ‘गद्दार’ म्हणण्यापेक्षा एकनाथ शिंदे यांनी वंदनीय बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे ठरवले हे योग्य की अयोग्य ते सांगावे. काँग्रेस, एनसीपी बरोबर जाऊ नये हा बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारे पन्नास जण ‘गद्दार’ कसे… ह्याला धाडस म्हणतात.’

    शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड करत अपक्षांसह ५० आमदार आणि खासदारांना पक्षातून बाहेर काढले. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकारही पडल्याने उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शिंदे हे मुख्यमंत्री झाले. मात्र ठाकरे समर्थकांकडून दे गटात गेलेल्या नेत्यांना गद्दार असे म्हटले जात आहे.