…तर अशा लोकांना ठोकून काढा, राज्यपाल व सुधांशू त्रिवेदी यांच्यावर उदयनराजेंचा घणाघात

राज्यपालांना राज्यातून हद्दपार केले पाहिजे, तर भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी अशा लोकांना ठोकून काढले पाहिजे मग ते ठिकाणावर येतील अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार उद्यनराजे भोसले यांनी दिली आहे. यावेळी त्यांना राज्यपाल व सुधांशू त्रिवेदी (sudhanshu trivedi) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसेच केंद्राने आता राज्यपालांना परत बोलावले पाहिजे, ते वांरवार छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करत आहेत, असं खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले.

  सातारा – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी काही दिवसांपूर्वी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तेव्हा मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने हा मुद्धा उचलून धरत राज्यपाल व भाजपावर टिका केली होती. तसेच राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उन्हाळी अधिवेशनात सभागृहात देखील उमटले. त्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यातच भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा पत्र लिहून औरंगजेबची माफी मागितली होती, असं विधान केल्यानंतर राज्यातील वातावरण तापले असून, भाजपाच्या राज्यपालांच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे, तसेच राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत.

  दरम्यान, आता भाजपा खासदार उद्यनराजे भोसले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांना राज्यातून हद्दपार केले पाहिजे, तर भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी अशा लोकांना ठोकून काढले पाहिजे मग ते ठिकाणावर येतील अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. यावेळी त्यांना राज्यपाल व सुधांशू त्रिवेदी (sudhanshu trivedi) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसेच केंद्राने आता राज्यपालांना परत बोलावले पाहिजे, ते वांरवार छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करत आहेत, असं खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले.

  काय म्हणाले राज्यपाल?

  दरम्यान, आज मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलताना राज्यपाल (Bhagat Singh Koshyari) म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते. मात्र आता नवीन काळातील नितीन गडकरी हे आदर्श आहेत, असं राज्यपालांनी म्हटल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावर मविआ, संभाजी ब्रिगेड तसेच शिवप्रेमीतून संतप्त प्रतिक्रिया येत असून, राज्यपालांवर टिका होत आहे. आजच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) तसेच शरद पवार (Sharad Pawar) हे उपस्थित होते. याआधी सुद्धा राज्यपालांनी  छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

  पूर्वी काय म्हणाले होते राज्यपाल?

  राजभाषा मराठी दिनानिमित्त औरंगाबादमध्ये श्रीसमर्थ साहित्य संमेलनाचे उद्घाटन पार पडले. यावेळी बोलताना राज्यपाल म्हणाले की, चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? शिवाजीला किंवा चंद्रगुप्ताला छोटं नाही म्हणत आहे मी. पण गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं. त्यामुळं समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? असं राज्यपाल म्हणाले होते, तेव्हा त्यावेळी देखील मोठा वाद निर्माण झाला होता.