…तर अंर्तगत खदखद वाढणारच; उदयनराजेंचे महाविकास आघाडी सरकारबाबत मोठं वक्तव्य

माध्यमातून जे चित्र दिसत आहे. ते गेले दाेन वर्षांपासून सुरु असल्याचे सातत्याने कानावर येत हाेते. ही खदखद सुरु हाेती. ज्यावेळेस एका विचाराने एका ध्येयाने प्रेरीत हाेऊन लाेक एकत्र येतात. त्यांना काेणतेही आमिष दाखविण्याची गरज नसती. परंतु भिन्न विचारांच्या लाेक सत्तेसाठी एकत्र आले आणि त्यांनी सत्ता स्थापन केली.

    सातारा : जर नागरिकांना आणि त्यांच्या कामांना वेळ दिला जात नसेल तर अंर्तगत खदखद वाढणारच. या मतभेदांची कुणकूण कानावर होतीच. राज्यातील महाविकास आघाडीचे पतन झाले. यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही, अशी थेट प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी दिल्ली येथून दिली.

    शिवसेनेचे नेते, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य आमदारांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार काेसळणार याची चर्चा देशभरात सुरु आहे. यावर खासदार उदयनराजे भाेसले यांनी यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही, असे वक्तव्य उदयनराजे यांनी दिल्लीत झालेल्या पत्रकारांशी संवादादरम्यान केले.

    उदयनराजे भाेसले म्हणाले, माध्यमातून जे चित्र दिसत आहे. ते गेले दाेन वर्षांपासून सुरु असल्याचे सातत्याने कानावर येत हाेते. ही खदखद सुरु हाेती. ज्यावेळेस एका विचाराने एका ध्येयाने प्रेरीत हाेऊन लाेक एकत्र येतात. त्यांना काेणतेही आमिष दाखविण्याची गरज नसती. परंतु भिन्न विचारांच्या लाेक सत्तेसाठी एकत्र आले आणि त्यांनी सत्ता स्थापन केली. वेगवेगळी विचारधारेचे लाेक एकत्र आले. त्यामुळे त्यांना आमिष दाखवावे लागले.

    अन्य पक्षांच्या पक्षश्रेष्ठींवर मी भाष्य करणार नाही. परंतु त्यांनी त्यावेळी त्यांनी एकत्र येताना विचार करायला हवा हाेता. मूळात हे टिकणार ते किती दिवस टिकणार. पक्षश्रेष्ठींकडून लाेकांना वेळ दिला जात नाही. काम हाेत नाही. असे हाेत असताना स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका लागणार आहेत. या सर्व निवडणुकांना सामाेरे जावे लागणार आहे. या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपचे विराेधक काेण आहेत तर राष्ट्रवादी काॅंग्रेेस आणि काॅंग्रेस. त्यामुऴे ही समीकरण जुळणार नव्हती. ती जुळवली गेली, असेही उदयनराजे म्हणाले.