
'सबसे कातील अदा...' म्हणत आपल्या गाण्यावर तरुणाईला ठेका धरण्यास भाग पाडणारी आणि जिचा कार्यक्रम लोकं घरावर, शाळेवर चढून पाहतात, अशा ह्या गौतमी पाटील हीने मागील काही दिवसांपासून राज्यभरातील तरुणांना वेड लावलं आहे.
सातारा : महाराष्ट्राला वेड लावणारी, तरुणांना आपल्या नृत्याने भुरळ पाडणारी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या डान्सची एक झलक पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी होते. ‘सबसे कातील अदा…’ म्हणत आपल्या गाण्यावर तरुणाईला ठेका धरण्यास भाग पाडणारी आणि जिचा कार्यक्रम लोकं घरावर, शाळेवर चढून पाहतात, अशा ह्या गौतमी पाटील हीने मागील काही दिवसांपासून राज्यभरातील तरुणांना वेड लावलं आहे. गौतमी पाटील हिचा साताऱ्यात कार्यक्रम झाला. यावेळी तिने भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची गौतमी पाटील हिने साताऱ्यातील (Satara) त्यांच्या जलमंदिर या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.
उदयनराजे हे आमचे दैवत …
दरम्यान, माध्यमांशी बोलताना गौतमी पाटील म्हणाली की, आज माझे जरी मोठ्या प्रमाणावर चाहते असले तरी छत्रपती उदयनराजे भोसले हे आमचे दैवत आहेत. त्यामुळे मी त्यांच्यापेक्षा मोठी नाही. त्यांची माझ्याबरोबर बरोबरी नको, ते दैवत आहेत. असं गौतमी म्हणाली. तसेच महाराजांना पहिल्यांदाच मी भेटले. त्यांचा आशीर्वाद कायम सोबत राहावा. यासाठी मी छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेण्यासाठी आले होते. असं गौतमी म्हणाली.
गौतमीने उदयनराजेंना भेटवस्तु कोणती दिली?
गौतमीचे महाराष्ट्रात लाखो चाहते आहेत. तिला पाहण्यासाठी लोकांची तुंबड गर्दी होते. सोमवारी गौतमी साताऱ्यात एका कार्यक्रमासाठी आली होती. यावेळी तिने उदयनराजेंची भेट घेतली. गौतमीने पुढच्या महिन्यात तिचा घुंगरु चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचेही सांगितले. यावेळी ही आमची पहिलीच भेट असून छ. उदयनराजे यांना आवडत असल्याने परफ्यूम भेट आणल्याचेही तिने सांगितले.