Three Member Ward Systems

भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शिवसेना संपण्याच्या मार्गावर असल्याचं विधान केलं आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. राजकारणात विजय आणि पराभव होत असतो. पण आता संपवण्याची भाषा केली जात आहे, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितले आहे.

    मुंबई: इतरांकडून शिवसेनेला (Shivsena) संपवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंनी (Uddhv Thackeray Speech At Matoshri) मातोश्रीवर जळगावच्या शिवसैनिकांशी संवाद साधला. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा (J P Nadda) यांनी शिवसेना संपण्याच्या मार्गावर असल्याचं विधान केलं आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. राजकारणात विजय आणि पराभव होत असतो. पण आता संपवण्याची भाषा केली जात आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. अनेक आव्हानं पायदळी तुडवत आम्ही झेंडा रोवला आहे असंही यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

    बंड याआधीही झाले असून मी त्यांना सामोरं गेलो आहे. हे बंड थंड करण्याची ताकद माझ्याकडे आहे. पण आता राजकारणात तुम्हाला मुळापासून संपवण्याचा डाव आखला जात आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.

    दोन ते तीन वेगवेगळ्या पातळ्यांवर आपली लढाई सुरु आहे. रस्त्यावरील लढाईत आपण कमी पडणार नाही. कोर्टातही सुनावणी सुरु आहे. तिसरी लढाई म्हणजे शपथपत्र आणि सदस्य नोंदणी आहे. विषय गंभीर आहे. हा विषय अर्ध्यात सोडू नका, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं. न्यायदेवतेवर माझा विश्वास असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.