Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

'आम्ही तुमचं हिंदुत्त्व मानायला तयार नाही. देशातील लोकशाही ठेवायची नाही, अशी आजची वाटचाल सुरु आहे. जेव्हा-जेव्हा जातीय तेढ निर्माण होतो तेव्हा समजून जा निवडणुका जवळ आल्या', असे ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितले.

संभाजीनगर : ‘आम्ही तुमचं हिंदुत्त्व मानायला तयार नाही. देशातील लोकशाही ठेवायची नाही, अशी आजची वाटचाल सुरु आहे. जेव्हा-जेव्हा जातीय तेढ निर्माण होतो तेव्हा समजून जा निवडणुका जवळ आल्या’, असे ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितले. तसेच भाजपकडून तळवे चाटण्याच्या आरोपावर उद्धव ठाकरे टीका करताना म्हणाले, ‘मला शिवसेनाप्रमुखांची भाषा येत नाही असं नाही. पण मला आवरावं लागतं आणि ती भाषा मला शोभणारी नाही. पण मग तुम्ही मिंधेंचे काय चाटताय? नितिशकुमारांचं काय चाटतं होता?’, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर (BJP) टीकास्त्र सोडले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची एकत्रित सभा होत आहे. ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. त्यामध्ये आता उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ‘जेव्हा-जेव्हा जातीय तेढ निर्माण होतो तेव्हा समजून जा निवडणुका जवळ आल्या आहेत. संभाजीनगरच्या नामांतराचा निर्णय महाविकास आघाडी सरकारचा आहे. माझ्यावर हिंदुत्त्व सोडल्याचा आरोप होत आहे. काँग्रेससोबत गेल्यामुळे हिंदुत्त्व सोडल्याची टीका माझ्यावर केली जात आहे. पण मला एक उदाहरण द्या की मी हिंदुत्त्व सोडलं. पुन्हा तोंड दाखवायला येणार नाही, असे त्यांनी सांगितले.

पदवी मागितली तर दंड

अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, त्यांना न्यायालयाकडून दंड ठोठावण्यात आला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, ‘पंतप्रधानांची पदवी मागितली तर 25 हजारांचा दंड ठोठावला जातो. भाजपला जमलं नाही ते महाविकास आघाडीने करून दाखवलं. हो आम्ही सत्तेसाठी आलो होतो. पण सत्तेनंतरही आम्ही एकत्र आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.

…पण मला आवरांव लागतं

मला शिवसेनाप्रमुखांची भाषा येत नाही, असे नाही. पण मला आवरावं लागतं. ती भाषा मला शोभणारी नाही. ती भाषा त्यांनाच शोभायची. माझ्यावर तळवे चाटल्याचा आरोप करताय, मग तुम्ही मिंधेंचे काय चाटताय? नितिशकुमारांचं काय चाटतं होता?, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.