Uddhav Thackeray criticizes Raj Thackeray without naming him

संजय दत्तला जसे सिनेमात गांधीजी दिसतात तशी एक केस आहे आपल्याकडे आहे. स्वतः ला बाळासाहेब समजायला लागलाय. शाल घालून फिरतोय असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता राज ठाकरेंवर टीका केली आहे (Uddhav Thackeray criticizes Raj Thackeray without naming him).

    मुन्नाभाई सिनेमात शेवटी संजय दत्तला कळत की डोक्यात केमिकल लोचा झालाय असे मुन्नाभाई फिरताहेत. संजय दत्तला गांधी दिसतात तसे राज ठाकरेंना बाळासाहेब झाल्यासरखं वाटतंय. त्यातला मुन्नाभाई लोकांचं भलं तर करायचा. मात्र शेवटी संजय दत्तला कळतं की आपल्या डोक्यात केमिकल लोचा झाला. मात्र तो मुन्नाभाई लोकांच भलं तरी करायचा याच काय? तसे मुन्नाभाई फिरत राहु द्या असही मुख्यमंत्री म्हणाले.

    आता आदित्य तिरुपतीला गेला होता आता अयोध्या. रामज्नमभूमीला मी जातांना शिवनेरीची पवित्र माती नेली. तेव्हा चमत्कार योगायोग म्हणा आपल्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो त्याचे भांडवल आम्ही केले नाही.

    रामाचा आणि हनुमानाचा अपमान करू नका, ते हृदयामध्ये असायला पाहिजेत, आमच्या हृदयामध्ये आहेत. श्रीलंका परत का पेटली याचा विचार करा. मध्ये कोणी तरी सांगितलं, मोदीजींनी धान्य फुकट दिलं. अरे कच्च खाणार का? ते शिजवायच कसं? गॅसच्या किंमती पहा. आमचं हिंदुत्व हे घर पेटवणार नाही, अख्ख घर पेटलं तरी चुल पेटत नाही, आमचं हिंदुत्व चूल पेटवणारं आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.