उद्धव ठाकरे दिसले प्रत्यक्ष मैदानात; आदित्य, रश्मी वहिनींसोबत मविआ मोर्चात सहभागी, ठाकरे प्रतिमा बदलण्याच्या प्रयत्नात आहेत का?

ठाकरे म्हणाले, संयुक्त महाराष्ट्रानंतर हे अफाट मोर्चाचं चित्र पहिल्यांदाच देशानं आणि जगानं पाहिलं असेल. बेळगाव, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झाला नाही, तो झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणारे तोतये आहे. दिल्लीपुढं बाळासाहेब कधी झुकले नव्हते.

    मुंबई – महापुरुषांविषयी करण्यात आलेली वादग्रस्त विधानं, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आणि राज्यातून बाहेर चाललेले उद्योग या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आज मुंबईत महाविकास आघाडीकडून महामोर्चा काढला जात आहे.

    मविआच्या मोर्चामध्ये ठाकरे कुटुंबीय सहभागी झाले आहेत. मविआच्या महामोर्चामध्ये रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे सहभागी झाले आहेत. ठाकरे प्रतिमा बदलण्याच्या प्रयत्नात आहेत का? असा प्रश्न यावेळी निर्माण झाला. तसेच राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, अजित पवार, नाना पटोले, सुप्रिया सुळे आदी मोठे नेते सहभागी झाले आहे.

    ठाकरे म्हणाले, संयुक्त महाराष्ट्रानंतर हे अफाट मोर्चाचं चित्र पहिल्यांदाच देशानं आणि जगानं पाहिलं असेल. बेळगाव, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झाला नाही, तो झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणारे तोतये आहे. दिल्लीपुढं बाळासाहेब कधी झुकले नव्हते. खुर्ची गेली तरी चालेल राज्याच्या अस्मितेशी तडजोड करणार नाही.

    राज्यपालांबाबत ते म्हणाले की, मी राज्यपालांना राज्यपाल मानत नाही. केंद्रात जो बसतो त्यांच्या घरी काम करणाऱ्यांना पाठवायचं नसतं. छत्रपतींचं नाव घेण्याचा अधिकार लफंग्यांना नाही. हे राज्य लुटायला आलेले आहेत. महिलांविषयी अवमानकारक वक्तव्यावर उद्धव ठाकरे संतापले.