Aditya Thackeray
Aditya Thackeray

बंडखोरांना आव्हान देत आदित्य ठाकरे म्हणाले की, मी चॅलेंज देतो की या आणि आमच्यासमोर येऊन बसा. मी त्यांना काहीही बोलणार नाही. हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवणार. पण त्यांनी डोळ्यात डोळे घालून सांगावे की आम्ही काय कमी केले आणि यांनी असे का केलं? असा सवाल त्यांनी केला.

    मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना गेल्या २० मेला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, असा गोप्यस्फोट मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेना मेळाव्यात केला आहे. गेल्या २० मेला उद्धव साहेबांनी शिंदेना वर्षावर बोलावले होते आणि मुख्यमंत्री व्हायचे का असे विचारले होते. पण रडारडी केली, या फाईल थांबवल्या थांबवल्या, त्या फाईल थांबवल्या असे म्हटले होते, आणि ऑफरनंतरही बंड केले, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

    बंडखोरांना आव्हान देत आदित्य ठाकरे म्हणाले की, मी चॅलेंज देतो की या आणि आमच्यासमोर येऊन बसा. मी त्यांना काहीही बोलणार नाही. हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवणार. पण त्यांनी डोळ्यात डोळे घालून सांगावे की आम्ही काय कमी केले आणि यांनी असे का केलं? असा सवाल त्यांनी केला.

    पुढे ते म्हणाले, की मुख्यमंत्र्यांचे प्रत्येकावर लक्ष असते. त्यांनी सर्वांना न्याय दिला. मात्र, त्यांनीच आज शिवसेनेला धोका दिला. या बंडखोरांची आज अशी स्थिती झाली की त्यांना आरशात सुद्धा पाहायला लाज वाटते. ज्यांना जायचे आहे त्यांना दरवाजे खुले आहेत आणि ज्यांना शिवसेनेत यायचे आहे, त्यांनाही दरवाजे खुले आहेत. पण जे विकले गेलेत त्यांना दरवाजे बंदच राहातील. तुमच्यात हिंमत असेल तर राजीनामे द्या आणि परत निवडून येऊन दाखवा असे आव्हानच आदित्य ठाकरे यांनी दिले.

    पुढे ते म्हणाले की, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो धनुष्यबान आपलाच राहणार. शिवसेना पक्ष आणि पक्षावरचे प्रेम आपलेच राहणार. आता बंडखोर आमदारांना दोनच पर्याय आहेत. एकतर त्यांनी भाजप किंवा प्रहारमध्ये प्रवेश घ्यावा. आमच्यासमोर ते अपात्र ठरणारच. मी त्यांना मतदारसंघात जावून पाडणार. पुन्हा बंडखोरांना आता विधानभवनाची पायरी चढू देणार नाही, असा इशाराही आदित्य ठाकरेंनी दिला.