बाळासाहेबांचा हात सोडल्याने 40 दगड बुडून गाळात गेल्याशिवाय राहणार नाहीत, संजय राऊत यांची टीका

आपण कागदी वाघ नाहीत शिवसेना हा धगधगता निखार आहे शिवसेना हा रक्तातून निर्माण झालेला इतिहास आहे रक्तातून निर्माण झालेला इतिहास हा कोणत्याही शाहीला मिटवता येत नाही.

  मुंबई – उद्धव ठाकरे हे सुद्धा आपले सदैव पक्षप्रमुख आहेत जनतेने बहाल केलेली ही पदं आहेत निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय हे सगळे कागदी प्रकार आहेत आणि आपण कागदी वाघ नाहीत शिवसेना हा धगधगता निखार आहे शिवसेना हा रक्तातून निर्माण झालेला इतिहास आहे रक्तातून निर्माण झालेला इतिहास हा कोणत्याही शाहीला मिटवता येत नाही. मग ते न्यायालय असेल किंवा निवडणूक आयोग असेल, कोणत्याही शाहीला ते मिटवता येणार नाही

  हे मूर्तीचोर आहेत, दुर्लक्ष करा

  आजचा दिवस अत्यंत पवित्र आहे. शिवसेनाप्रमुखांचा वाढदिवस आहे. शिवसेना आज आपल्यात असते तर ९७ वर्षांचे असते. आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही वाढदिवस आहे. दोन महापुरुषांचा जन्म आजच्या दिवशी झाला. “हे मूर्तीचोर आहेत, दुर्लक्ष करा. पावसाळ्यात गांडूळ जन्माला येतो. पण पावसाळ्यानंतर निघून जातो. त्या गांडूळांचं अस्तित्व आपल्याला दिसत नाही. संपूर्ण महाराष्ट्र आणि देशात शिवसेना म्हटलं की, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलं जातं. शिंदे-मिंधे काही नाही”, अशी टीका संजय राऊत यांनी केलं.

  नाही मला खोके नको, आम्ही मोदीचे माणसं आहोत.
  आपल्या देशाच्या राजकारणात फार गंमतीजमती होत असतात मुख्यमंत्री दावोसला गेले, आपल्याला माहिती नाही ते दावोस कुठंय? आपल्याला दापोली माहिती आहे दावोसला तिथे महाराष्ट्रात गुंतवणीकीचं कार्यालय केलं तिथे आपले मुख्यमंत्री बसले होते. तिथे दोन-चार लोक अचानक आले. हे गडबडले, बोलायचं काय? विचारात पडले तिथल्या देशाचे पंतप्रधान म्हणाले, अरे तुम्ही येथे हो आम्ही इथे, किती खोके देऊ तुम्हाला? येता आमच्या पक्षात येता? ते म्हणतात, नाही मला खोके नको, आम्ही मोदीचे माणसं आहोत. तुम्हीपण मोदीचे माणसं आहात. आम्हीपण मोदीचे माणसं आहोत. बरं झालं. मग त्यांनी एक सेल्फी काढला. फोटो काढा आणि मोदींना दाखवा