eknath shinde and uddhav thackeray

या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या बंडखोरी नाट्याला मोठी कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपासोबत सत्ता स्थापन करण्याची अट एकनाथ शिंदेंनी घातल्यानंतर आज खुद्द उद्धव ठाकरेंनीच फेसबुक लाईव्हमध्ये देखील शिवसैनिकच मुख्यमंत्री झाला तर आनंदच आहे, अशी भूमिका मांडली आहे.

    मुंबई – एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडखोरीनंतर एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून भावनिक शब्दांत व्यथा मांडली असताना दुसरीकडे आता त्यांनी एकनाथ शिंदेंना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर (offers CM post ) दिली आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या बंडखोरी नाट्याला मोठी कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपासोबत सत्ता स्थापन करण्याची अट एकनाथ शिंदेंनी घातल्यानंतर आज खुद्द उद्धव ठाकरेंनीच फेसबुक लाईव्हमध्ये देखील शिवसैनिकच मुख्यमंत्री झाला तर आनंदच आहे, अशी भूमिका मांडली आहे.

    एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार दोलायमान अवस्थेत आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. एकीकडे एकनाथ शिंदेंनी आपल्याला ४६ आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितल्यामुळे उद्धव ठाकरे सरकार अल्पमतात आल्याचं सांगितलं जात असताना दुसरीकडे भाजपाकडून यावर सावध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. गटनेते पदावरून देखील एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांच्यामध्ये वाद झाल्यानंतर शिंदे शिवसेनेतून बाहेर पडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना दिलेल्या ऑफरमुळे गणितं बदलण्याची शक्यता आहे.