Uddhav Thackeray on Hindutva

हनुमान चालिसा, भोंगे वाले ही यांची ए, बी, सी टीम सध्या कार्यरत आहे. आमचं हिंदुत्व खरे की खोटे हे ठरवणारे तुम्ही कोण? हिंदुत्व हे काय धोतर आहे का? कधी नेसले कधी सोडले? हिंदुत्व ही धरण्याची सोडण्याची गोष्ट आहे का? काँग्रेसबरोबर गेलो तरी आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही असे म्हणत हिंदूत्वाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे(Uddhav Thackeray on Hindutva).

    शिवसेना ही बाळासाहेबांची नाही म्हणता मग तुमचा पक्ष अटलजींचा आहे का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. गेल्या 25 वर्षात आम्ही देखील सडलो. हिंदुत्वाचा बेसूर आणि भेसूर चेहरा आता आम्ही पाहत आहोत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

    सामनात जे छापून येते ते जनतेच्या आणि हिंदुत्वाच्या हिताचे असते. भाजप जी भाषा वापरते तसं आम्ही बोलत नाही. खोटे बोलणे हे त्यांच्या हिंदुत्वात बसते आमच्या हिंदूत्वात ते बसत नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले.