राजकीय घडामोडींना वेग…, शरद पवारांना भेटण्यासाठी ‘सिलव्हर ओक’ वर उद्धव ठाकरे, भेटीचं कारण माहितेय का?

उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या ‘सिलव्हर ओक’ या निवासस्थानी भेटीसाठी पोहचले आहेत. त्यामुळं राजकीय घडामोडींना वेग आला असून, दोन नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा होतेय. उद्धव ठाकरे यांच्याोसबत खासदार संजय राऊत देखील आहेत. तर जयंत पाटील हे पवारांसोबत आहेत.

    मुंबई : सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मागील १५ दिवसांपासून मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) हे उपोषणला बसले आहेत. यावरुन सत्ताधारी कोडींत सापडले आहेत, तर विरोधकांना हा आयता मुद्दा हातात मिळाला आहे. यावरुन राजकारण तापले असताना, आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या ‘सिलव्हर ओक’ या निवासस्थानी भेटीसाठी पोहचले आहेत. त्यामुळं राजकीय घडामोडींना वेग आला असून, दोन नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा होतेय. उद्धव ठाकरे यांच्याोसबत खासदार संजय राऊत देखील आहेत. तर जयंत पाटील हे पवारांसोबत आहेत.

    बैठकीपूर्वी चर्चा….

    दरम्यान, उद्या 13 सप्टेंबर आहे. शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी इंडिया आघाडीची समन्यव समितीची बैठक पार पडणार आहे. तर इंडिया आघाडीची 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईत बैठक झाली. उद्याच्या बैठकीत समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे.  याच बैठकीसंबंधी चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सिलव्हर ओकवर पोहोचले असतील, अशी शक्यता आहे.

    येत्या 18 सप्टेंबरपासून संसदेच विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. त्याची रणनिती सुद्धा समन्वय समितीच्या बैठकीत ठरवली जाऊ शकते. NDA ला सभागृहात कसं घेरायच? त्याशिवाय एनडीएला पुन्हा सत्तेपासून रोखण्यासाठी काय रणनिती आखायची? याची चर्चा बैठकीत होऊ शकते. त्यामुळं उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीसाठी गेले असून, यावर खलबतं होत आहे.