लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीचे भांडण, जनतेने ठरवावे काय हवे? प्रकाश आंबेडकर

लोकशाही विरुद्ध हुकुमशाही असे भांडण आहे. जनतेला ठरवावे लागेल की, आपल्याला हुकुमशाही हवी की लोकशाही असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

    मुंबई – प्रकाश आंबेडकर आणि माझे प्रबोधनकार डाॅट काॅम या वेबसाईटचा लोकार्पण सोहळा आज दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती होती. प्रबोधनकारांवर व त्यांच्या विचारांवर पी.एचडी. करणाऱ्या संशोधकांचा सत्कार करण्यात आला.

    लोकशाही विरुद्ध हुकुमशाही असे भांडण आहे. जनतेला ठरवावे लागेल की, आपल्याला हुकुमशाही हवी की लोकशाही असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

    प्रकाश आंबेडकर म्हणाले, मनुस्मृती असे विष आहे की, ते प्यायल्यानंतर बळी माणसांचा तर जातो पण देशाचाही जातो. यातून आपण जेवढे बाहेर पडू त्यातून लवकर आपण बाहेर पडू. देशाला गुलामीचा इतिहास आहे. गुलामीचा एकाच वर्गाची आहे. उरलेले त्यात भरडले आहे.

    प्रकाश आंबेडकर म्हणाले, राजेशाही ही संकल्पना क्षत्रियांची होती. त्यांची लढण्याची संकल्पना होती. एकदा क्षत्रिय हरला की, उरलेले सर्व हरले. उरलेल्यांना शस्त्र घेण्याचा अधिकार नव्हता. याला अपवाद फक्त शिवाजी महाराजांचा होता. तो अपवाद बघत- बघत मी असे म्हणेल की, आम्ही मनुच्या कायद्यात अडकून पडणार आहोत की, नव्याने काही उभे करणार आहोत.

    प्रकाश आंबेडकर म्हणाले, हिंदु हा शब्द आपण मानत आलो. यात दोन विचारसरणी आहेत असे मी मानतो. एक वैदिक परंपरा तर दुसरी संतांची परंपरा. त्यांचे वर्णन करताना विधेवेचे एकीकडे मुंडण तर दुसरीकडे पुर्नविवाह आहे. आपल्याला नेमकी कोणती पाहीजे. प्रबोधनकारांनी वैदीक परंपरेवर आसूड ओढले आहेत. भवितव्याचा विचार करायचा असेल तर हा धर्म सार्वजनिक कसा होईल याची त्यांनी मांडणी केली.