संजय राऊतांना शंभर दिवस तुरुंगात ठेवले, देशात राजकीय अराजकता : सुभाष देसाई

प्रबोधनकार डाॅट काॅम या वेबसाईटचा लोकार्पण सोहळा आज दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती होती.

    मुंबई – संजय राऊत यांच्यासारख्या शिवसेनेच्या मोठ्या नेत्याला शंभर दिवस तुरुंगात ठेवणे हे एकप्रकारे अराजकताच आहे. देशात सध्या अराजकता असून ही अराजकता दुर करण्यासाठी देशातील सर्व नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. समाजसुधारक होते असे गौरोद्वगार माजी मंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी आज केले.

    प्रबोधनकार डाॅट काॅम या वेबसाईटचा लोकार्पण सोहळा आज दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती होती. प्रबोधनकारांवर व त्यांच्या विचारांवर पी.एचडी. करणाऱ्या संशोधकांचा सत्कार करण्यात आला.

    माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते सुभाष देसाई म्हणाले, आज देशातील अराजकता दुर करण्यासाठी देशातील सर्व नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. प्रबोधनकारांचे साहित्य महत्वाचे आहे. सध्या डेटींग अ‌ॅपही सुरू केली जात असतानाच अशी वैचारिक वेबसाईट चालवण्याचे काम करणे हे कौतुकास्पद आहे. प्रबोधनकार यांचे कार्य धक्क्यामागून धक्के देणारे आहे. ते थोर समाजसुधारक होते.