udhav thackrey

तुमच्याकडे आज बळ आहे, उद्या दिवस फिरले की काय होईल बघा, असा असा इशारा उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिला आहे. अडीच वर्षात मुख्यमंत्रीपदाची हवा नाही गेली. काळ नेहमी बदलत असतो, बदलला की दुष्टपणाने वागू शकतो. असा टोला सुद्धा उद्धव ठाकरेंनी लगावला. तसेच विरोधकांनी वाटेल ते करुन अडकवायचे हे देशात सुरु आहे. बळाचा व सत्तेचा वापर विरोधकांना अडकवण्यासाठी होत आहे. पक्ष संपवायची हौस असेल तर जनतेत दाखवून संपवून दाखवा असं हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी जे पी नड्डा. व भाजपावर केला.

    मुंबई : रविवारी सकाळी ईडीने (ED) संजय राऊत (Sanjay raut) यांच्या घरी छापेमारी मारत तब्बल नऊ तास चौकशी केली. भांडुप येथील मैत्री या निवासस्थानी (Bhandup maître house) त्यांची चौकशी सुरू होती. त्यानंतर राऊतांना ईडीने ताब्यात घेतले. ईडीने ताब्यात घेतल्यानंतर खासदार संजय राऊतांनी आपण स्वत:हून अटक होण्याचे म्हटलं होतं. त्यानंतर रात्री उशिरा राऊत यांना ईडीनं अटक (ED Arrest) केलीय. आणि आज कोर्टात (Court) हजर केलं. या सर्वं घडामोडींनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) संजय राऊत यांच्या भांडूप येथील घरी जाऊन राऊत कुंटुबाची भेट घेत आपण तुमचा पाठीशी आहोत. घाबरण्याचे कारण नाही असं म्हणत राऊत कुंटुबांला धीर दिला. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत भाजपा व केंद्रीय तपास यंत्रणेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. (Uddhav Thackeray Press conference)

    बळाचा व सत्तेचा गैरवापर

    दरम्यान, भाजपा सत्तेचा गैरवापर करतोय, तसेच राजकारणात बळाचा वापर होतोय, त्यामुळं वेळ जाण्याच्या आधी जनतेनं विचार करावा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी जनतेला केलं आहे. दरम्यान, आपण प्रादेशिक पक्षाची मोट बांधणार आहोत. नड्डाचं विधान अतिशय घातक व घृणास्पद आहे. त्यांच्या जे पोटात होते ते ओठावर आले. नड्डाचं विधान हुकुमशाहीकडे नेणारं असल्याची जोरदार टिका उद्धव ठाकरेंनी जे पी नड्डांवर केली.

    भाजपाचा वंश कुठून आलाय?

    दरम्यान पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपाचा वंश कुठून आलाय, भाजपाचा वंश कुठून सुरु झालाय हे ठरवणं गरजेचं असल्याची बोचरी टिका भाजपावर केली. सध्याचे भाजपाच राजकारण घृणास्पद आहे. गुलामगिरीकडे वाटचाल करण्याची भाजपाची रणनिती आहे. संजय राऊत यांचा मला अभिमान आहे. असं म्हणत भाजप प्रादेशिक पक्षांना संपविण्याची रणनिती आखत असल्याची घणाघाती टिका उद्धव ठाकरेंनी भाजपावर केली.

    हेही दिवस फिरतील

    तुमच्याकडे आज बळ आहे, उद्या दिवस फिरले की काय होईल बघा असा असा इशारा उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिला आहे. अडीच वर्षात मुख्यमंत्रीपदाची हवा नाही गेली. काळ नेहमी बदलत असता, बदलला की दुष्टपणाने वागू शकतो. असा टोला सुद्धा उद्धव ठाकरेंनी लगावला. तसेच विरोधकांनी वाटेल ते करुन अडकवायचे हे देशात सुरु आहे. बळाचा व सत्तेचा वापर विरोधकांना अडकवण्यासाठी होत आहे. पक्ष संपवायची हौस असेल तर जनतेत दाखवून संपवून दाखवा असं हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी जे पी नड्डा. व भाजपावर केला. आता उद्धव ठाकरेंच्या टिकेवर भाजपाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.