ईडीची दमनशाही, दडपशाही सुरु आहे, संजय राऊतांच्या ईडी कारवाईनंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

हे सगळ कारस्थान इतक्या निर्लज्जपणाने चाललेलं आहे की, लाज-लज्जा शरम सोडून हे कारस्थान चाललेले आहे. ईडीची (ED) दमनशाही, दडपशाही सुरु आहे. असा घणाघात भाजपा (BJP) व ईडीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केला. (Uddhav Thackeray rection on sanjay raut ed action) 

    मुंबई : आज सकाळी ईडीने (ED) संजय राऊत (Sanjay raut) यांच्या घरी छापेमारी करत तब्बल नऊ तास चौकशी केली. त्यानंतर त्यांना आता ईडीने ताब्यात घेतले आहे. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) प्रतिक्रिया समोर आली आहे. आज संजय राऊतांना कदाचित अटक (Arrest) होण्याची शक्यता आहे. आज त्यांनी रोखठोक लिहिलेले आहे. त्याच्यात त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहे. पण हे सगळ कारस्थान इतक्या निर्लज्जपणाने चाललेलं आहे की, लाज-लज्जा शरम सोडून हे कारस्थान चाललेले आहे. ईडीची दमनशाही, दडपशाही सुरु आहे. असा घणाघात भाजपा व ईडीवर (ED and BJP) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केला. (Uddhav Thackeray rection on sanjay raut ed action)

    दरम्यान, हिंदुत्व त्याला हिंदुत्व हा शब्द बोलायचं तेव्हा कुणाचं धाडस होत नव्हतं, तेव्हा शिवसेनाप्रमुख हा एकमेव मर्द होता या देशामध्ये. अमरनाथ यात्रेला जेव्हा धोका निर्माण झाला तेव्हा कुठे होते आज जे बसलेत त्यांची नामोनिशाणी तरी होती का?  काय केल त्यांनी?  पण तेव्हा शिवसेनाप्रमुखांच्या हातामध्ये सत्ता नव्हती, तुमच्यासारखे जिवाला जीव देणारे शिवसैनिक आणि त्यांच्या जोरावर त्यांनी सांगितले अमरनाथ यात्रेमध्ये जर का वेडे वाकड घडलं तर मी इकडून तुमची हजला जाणारी विमान उडू देणार नाही.

    काल मी बोललो कोश्यारींनी महाराष्ट्र का घी देखा लेकिन कोल्हापूर का जोडा नही देखा. याच भाषेमध्ये मी बोललो आणि बोलणारच. जो जो महाराष्ट्राच्या मुळावरती येईल तो कोणीही असला तरी त्याचा आदर तर शक्यच नाही त्याला महाराष्ट्र म्हणून काय आहे ते दाखवल्या शिवाय राहणार नाही. असं सुद्धा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटले. दरम्यान, संजय राऊत यांच्या नऊ तासांच्या चौकशीनंतर त्यांना आता ईडीने ताब्यात घेतले असून, राऊतांना अटक होण्याची शक्यता आहे.