आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीत भव्य कावड यात्रा काढून केले शक्ती प्रदर्शन आणि उद्धव ठाकरेंवर टीका

आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीत भव्य कावड यात्रा काढली होती. या यात्रेमध्ये शक्ती प्रदर्शन करण्यात आले.

    हिंगोली : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची काल २७ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता निर्धार सभा पार पडली. उद्धव ठाकरे यांच्या सभेला काल हिंगोली शहरामधील रामलीला मैदान कमी पडले होते. या सभेला लाखोंच्या संख्येने शिवसैनिक ठाकरे यांच्या सभेला हिंगोली शहरामधील रामलीला मैदानात दाखल झाले होते. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षफुटीनंतर पक्षातील गद्दारांना त्यांची जागा तुम्हीच दाखवावी असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे गटातील आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

    उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीत भव्य कावड यात्रा काढली होती. या यात्रेमध्ये शक्ती प्रदर्शन करण्यात आले होते. या कावड यात्रेला कालीचरण महाराज यांच्या सह हजारोंच्या संख्येने शिवभक्त कावड यात्रेत सहभागी झाले होते. या यात्रेला जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.

    यावेळी आमदार संतोष बांगर यांनी हे हिंदुत्वाचा जल्लोष आहे हे सर्व शिवभक्त, शिवसैनिक आहेत ही ताकद छत्रपती शिवाजी महाराज, सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना मानणारी ताकत आहे. हे कोणत्याही प्रकारचं शक्ती प्रदर्शन नाही. दरवर्षी प्रमाणे यावर्षी तुम्ही बघत असाल कसे मुंग्यासारखे माणसं उपस्थित झाले आहेत. ही ताकत छत्रपती शिवरायांना मानणारी आहे. ही ताकत हिंदुत्वाला मानणारी ताकत आहे. ही ताकत एम.आय.एम, कॉंग्रेसकडे झुकलेली नाही असे म्हणत उद्धव ठाकरेंवर आमदार बांगर यांनी टीका केली.