narayan rane and uddhav thakre

राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपा आणि महाविकास आघाडीचे प्रत्येकी तीन उमेदवार निवडून आले आहेत. या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी भाजपाचे धनंजय महाडिक यांचा विजय तर संजय पवार यांचा पराभव झाल्यामुळे भाजपाकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. तसेच या पराभवाच्या निमित्ताने भाजपाचे अनेक नेते महाविकास आघाडीवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. ते सिंधुदुर्गमध्ये बोलत होते(Narayan Rane Vs CM Uddhav Thackeray).

    आतापर्यंतच्या इतिहासात मुख्यमंत्र्यांनी जी भाषा वापरली नाही त्या भाषेत उद्धव ठाकरे बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत होते. आम्ही वाघ आहोत, अमूक आहोत असे म्हणत होते. जी भाषा वापरायला नको होती ती भाषा वापरल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाचक्की आणि बेअब्रुपण झाली,” अशी खोचक टीका राणे यांनी केली.