कृती नसेल तर विचार हा विचार राहत नाही – उद्धव ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा १७ नोव्हेंबर हा स्मृतीदिन. त्यानिमित्ताने ठाकरे कुटुंबियांनी शिवाजी पार्कवर (Shivaji Park) जाऊन बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलं. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Press Conference) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर हल्लाबोल केला.

    मुंबई : कृती नसेल तर विचार हा विचार राहत नाही. सर्वचं स्वत:कडे घेण्याचा भाजपचा मनसुबा आहे, असं वक्तव्य शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं आहे.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा १७ नोव्हेंबर हा स्मृतीदिन. त्यानिमित्ताने ठाकरे कुटुंबियांनी शिवाजी पार्कवर (Shivaji Park) जाऊन बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलं. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर हल्लाबोल केला.

    काही जणांना शिवसेनाप्रमुख कोण होते हे समजायला दहा वर्ष लागली. त्यांना आता शिवसेनाप्रमुखांबद्दलचा पुळका आला आहे, अशा शब्दांमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे. शिवसेनाप्रमुखांच्या नावाचा बाजार मांडू नये एवढीच अपेक्षा करतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

    शिवसेनाप्रमुख म्हटलं तर संघर्ष हा ओघाने आला. अन्यायाविरुद्धचा लढा आला. मला आजचा हा स्मृतिदिन काहीसा वेगळा वाटत आहे. कारण काही जणांना शिवसेनाप्रमुख कोण होते समजायला दहा वर्ष लागली. त्यांना आता शिवसेनाप्रमुखांबद्दलचा पुळका आला आहे. अनेक शिवसेनाप्रमुख आहेत, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करण्यात काही हरकत नाही. मात्र ते करताना त्याचा कुठे बाजार होऊ नये, अशी माझी नम्र भावना आहे. बाजारुपणा दिसायला नको. विचार व्यक्त करण्यासाठी कृती असावी लागते. कृतीतून विचार व्यक्त करता येतो. कृती नसेल तर विचार हा विचार राहत नाही, तर केवळ बाजारुपणा आहे. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांच्या नावाचा बाजार मांडू नये एवढीच अपेक्षा करतो, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

    याशिवाय स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल विचारण्याचा तुम्हाला अधिकार नाही, असंही ते यावेळी म्हणाले. ज्यांचा स्वातंत्र्यसंग्रामात संबंध नाही, त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नयेत. तसेच राहुल गांधींच्या सावरकरांबद्दलच्या वक्तव्याशी मी सहमत नाही, असंही ते म्हणाले.