तेव्हा उद्धव ठाकरे पैसे मोजण्यात व्यस्त होते; किरीट सोमय्या यांचा घणाघात

किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा साधला मुख्यमंत्र्यांवर निशाणा करोना काळात मुख्यमंत्री पैसे मोजण्यात व्यस्त असल्याची केली टीका बुलडाणा येथील पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीवर हल्लाबोल नांदेड, अमरावती,मालेगावची हिंसा हा प्रयोग; फडणवीसाचा गंभीर आरोप

    बुलढाणा (Buldhana) : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडीविरोधात आक्रमकपणे मैदानात उतरले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळातील विविध सदस्यांवर ते घणाघाती आरोप करत आहे. अशातच आता बुलडाण्यात बोलताना सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर नवा आरोप केला आहे. (Kirit Somaiya Latest News)

    ‘उद्धव ठाकरे हे काम करण्यात नव्हे तर करोना काळात पैसे मोजण्यात व्यस्त होते, स्वतःच्या पत्नीचे १९ बेकायदेशीर असलेले बंगले वाचवण्यात व्यस्त होते, परिवहन मंत्री अनिल परब यांना मदत करण्यात व्यस्त होते,’ असा हल्लाबोल किरीट सोमय्या यांनी बुलडाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

    ‘बुलडाणा अर्बन’ने दिलेल्या कर्जासंबंधी माहिती घेण्यासाठी शुक्रवारी किरीट सोमय्या हे बुलडाण्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली.

    ‘करोनाच्या संपूर्ण काळात आपल्याला मान वर करायलाही वेळ मिळाला नाही, एवढं काम होतं आणि त्यामुळेच मानेचा त्रास सुरू झाला,’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटलं होतं. या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना किरीट सोमय्या म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे यांच्यावर आजच शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मी एकटाच नव्हे तर देशातील जनता देखील त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहे. भारतीय जनतेला हिंदुत्वाचा अभिमान असल्याने ते उद्धव ठाकरेंची प्रकृती बरी होण्याची देवाकडे प्रार्थना करत आहेत, भलेही ते हिरवेधारी झाले असले तरी,’ असा चिमटाही सोमय्या यांनी यावेळी काढला.

    दरम्यान, किरीट सोमय्या यांनी बुलडाणा अर्बन पतसंस्थेच्या मुख्य शाखेत जाऊन संचालकांशी चर्चा केली आणि चर्चेच्या दरम्यान ‘बुलडाणा अर्बन’ ही चांगल्या पद्धतीने आयकर विभागाच्या चौकशीला सहकार्य करत आहे आणि पुढेही करणार असल्याचं सांगत बुलडाणा अर्बन पतसंस्थेच्या पारदर्शी व्यवहाराची सोमय्या यांनी स्तुती केली आहे.