ललित पाटीलप्रकरणी उद्धव ठाकरेंची खरमरीत टीका; म्हणाले, आता बॉम्बस्फोटावेळी दाऊद भाजपाध्यक्ष असल्यासारखे….

Uddhav Thackeray : ससून ड्रग्जप्रकरणी ललित पाटीलला पकडल्यानंतर आता अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. ललित पाटीलप्रकरणात दादा भुसेंवर सुषमा अंधारेकडून गंभीर आरोप करण्यात आले. त्यावर दादा भुसेंनी हल्लाबोल चढवत याला संजय राऊत जबाबदार असल्याचे म्हटले आहे. तसेच, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत ललितचा प्रवेश झाला होता. आता यावर उद्धव ठाकरे यांनी यावर कडाडून हल्ला चढवत भाजप-शिंदे सरकारची खिल्ली उडवली आहे. वाचा सविस्तर रिपोर्ट.......

    मुंबई : ससून ड्रग्जप्रकरणी आता ललित पाटील (Lalit Patil) याला अटक केल्यानंतर मोठ मोठे खुलासे समोर येत आहेत. असे असताना, प्रशासकीय यंत्रणेपासून अनेक राजकीय नेत्यांवर संशयाची सुई आहे. दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर काही पोलिसांनादेखील निलंबीत करण्यात आले. त्यानंतर राजकीय चिखलफेकसुद्धा पाहायला मिळाली. सुषमा अंधारेंनी या प्रकरणात दादा भुसे आणि शंभुराजेंचे नाव घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यावर दादा भुसेंनी उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray) संजय राऊतांचे नाव घेतल्याने यावर उद्धव ठाकरेंनी खरमरीत टीका केली आहे.

    ललित पाटीलला ठाकरेंनीच शिवबंधन बांधल्याचा आरोप

    ललित पाटीलला ठाकरेंनीच शिवबंधन बांधल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. यावर बोलताना त्यांनी म्हटले की, हे म्हणजे बॉम्बस्फोटवेळी दाऊद भाजपाध्यक्ष असल्यासारखं. दरम्यान, ललित पाटील प्रकरणात सातत्याने ठाकरे गटावर निशाणा साधला जातोय. तर यावर ठाकरे गटाकडून देखील यावर प्रत्युत्तर देण्यात येतय. शनिवार (21 ऑक्टोबर) रोजी भाजपचे दिवा शहर प्रमुख रोहितदास मुंडे यांच्यासोबत 200 ते 300 कार्यकर्ते यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.

    2016 साली शिवसेना पक्षात प्रवेश

    ललित पाटील याने 2016 साली शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. पण त्यावेळी शिवसेना पक्ष हा एकत्र होता. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकराची फूट पडली नव्हती. ललित पाटीलने जेव्हा पक्षप्रवेश केला त्यावेळीच्या फोटोंमध्ये दादा भुसे हे देखील दिसत होते. त्यानंतर शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनेकांनी शिंदें गटाचा मार्ग स्वीकारला पण ललित पाटील हा मात्र त्यानंतर कोणत्याही चर्चेत आला नाही. त्यामुळे तो अजूनही ठाकरे गटातच असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे.

    उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं?
    ठाकरे गटाचे कल्यान लोकसभाचे संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत यांच्या नेतृत्वाखाली रोहिदास मुंडे भाजप दिवा शहर प्रमुख आणि 200 ते 300 कार्यकर्ते कार्यकर्ते आज ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ललित पाटीलवर भाष्य केलं. हे म्हणजे बॉम्बस्फोटवेळी दाऊद भाजपाध्यक्ष असल्यासारखं आहे. यावर सविस्तर मी दसरा मेळाव्यात बोलेन, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

    शिंदे गटाचे आरोप
    2016 साली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ललित पाटील याने पक्षात प्रवेश केला. त्यावेळी आपल्या पक्षात कशी माणसं येतात, ते काय करतात हे पाहणं पक्षाच्या प्रमुखांची जबाबदारी होती. 2016 मध्ये तो पक्षात आला होता त्यानंतर तो पक्षाच्या बाहेर गेला कधी गेला, दुसऱ्या पक्षात तो काम करायला लागला का यांसारखे प्रश्न देखील शिंदे गटाकडून ठाकरे गटाला विचारण्यात आले आहेत. तर यावर आता उद्धव ठाकरेंनीच प्रतिक्रिया दिली आहे.

    तर आता या ललित पाटील प्रकरणाला कोणतं नवं वळण मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ललित पाटील हा सध्या पोलिसांच्या ताब्यात असून यामध्ये कोण कोण सामील होतं यांची नावं तो सांगणार असल्याचा खुलासा यावेळी ललित पाटील याने माझाच्या कॅमेरामध्ये केला आहे.