उद्धव ठाकरेंचा वाचाळपणा थांबायचे नाव घेत नाही,महाराष्ट्राचे महानालायक; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारासाठी काल सोलापूरमध्ये त्यांची सभा पार पडली. या सभेला उद्धव ठाकरे उपस्थित होते.

    प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारासाठी काल सोलापूरमध्ये त्यांची सभा पार पडली. या सभेला उद्धव ठाकरे उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेते महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. सोलापुरातील सभेत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदींवर टीका केल्यानंतर भाजपकडून उद्धव ठाकरे यांना प्रतिउत्तर देण्यात आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत प्रतिउत्तर दिले आहे.

    महाराष्ट्राचे महानालायक उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना पुन्हा एकदा तोल गेला आहे. उद्धव ठाकरेंनी देवेंद्रजींच्या नावानं कितीही शिव्याशाप दिले तरी जनतेचे आशीर्वाद देवेंद्रजींसोबत कायम आहेत. उद्धव ठाकरे यांचा वाचाळपणा थांबायचे नाव घेत नाही. अडीच वर्ष घरात बसून काढली. त्यांच्याकडे बोलल्यासारखे एकही विकास काम नाही. मग लोकांसमोर गेल्यानंतर अशी मुक्ताचीफळे उधळण्याची वेळ येते, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

    उद्धव ठाकरे नैराश्यमध्ये गर्ता झाले आहेत. त्यांची ही वायफळ बडबड त्यांच्या पक्षातील उमेदवार आणि कार्यकर्त्यांना देखील नको आहे. उद्धव ठाकरेंनी आता एक गोष्ट लक्षात ठेवावी, तुम्ही मोदीजी आणि देवेंद्रजींबद्दल कितीही वायफळ बडबड करा.मात्र ४ जूनला जनता तुम्हाला तोंड दाखवण्यासाठी जागा ठेवणार नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

    चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, तोंडाळासीं भांडों नये | वाचाळासीं तंडोंनये |संतसंग खंडूं नये | अंतर्यामीं ||| असे रामदास स्वामींनी लिहिलेल्या मुर्खांची लक्षणं या ओळींचा वापर करत चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. त्यामुळे आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.