maharashtra political crisis so uddhav thackeray owns the right to election symbols and a b forms nrvb

  मुंबई – दसरा मेळावा परंपरेप्रमाणे शिवतीर्थावरच शिवतीर्थावरच घेणार. आतापर्यंत मुले पळवणारी टोळी ऐकली, पण सध्या बाप पळवणारी औलाद महाराष्ट्रात फिरत आहे. ज्यांना सत्तेचे दूध पाजले, मानमरातब दिला. आता त्यांनी तोंडाची गटारे उघडली आहेत, असा घणाघात बुधवारी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. ठाकरे शिवसेनेच्या गोरेगाव येथील गटप्रमुखांचा मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्याला शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली.

  ठाकरे म्हणाले की, “मुंबईवर आज गिधाडं फिरत आहेत. निवडणुका आल्यावरच यांना मुंबईची आठवण येते. अमित शाह हे त्यापैकीच एक. शिवसेनेला त्यांनी आस्मान दाखवणार असल्याचं सांगितलं. पण आम्ही त्यांना आस्मान दाखवणार आहोत. ही शिवसेना मराठी माणसाच्या बलिदानातून मिळाली आहे. यांना ही हातात घेऊन विकायची आहे.”

  शिवसेना म्हणजे विश्वास आहे, एक आधार
  शिवसेना म्हणजे विश्वास आहे, एक आधार आहे, म्हणून शिवसेनेवर मुंबईकर विश्वास ठेवतात. मुंबईवर ज्या ज्या वेळी संकटं आली त्या त्या वेळी शिवसैनिक धावून गेले होते असंही ते म्हणाले. धारावीत आर्थिक केंद्र व्हायला हवं होतं, पण ते गुजरातला पवळण्यात आलं असं उद्धव ठाकरे म्हणाले.ते म्हणाले की, महाराष्ट्रातले सगळे प्रकल्प गुजरातला नेले जातात. प्रकल्प गुजरातला न्यायचे आणि नंतर त्याला भरभरून आर्थिक मदत द्यायची. वेदांता महाराष्ट्रात येण्यासाठी केंद्राने सवलत का दिली नाही? दिल्लीत जाता तर मग पंतप्रधानांना ठणकावून का विचारत नाही?

  महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातेत न्यायचा आणि सवलती द्यायच्या
  ठाकरे म्हणाले, लाज वाटायला हवी तुम्ही कुणाची बाजू घेऊन मांडत आहात. चला मी तुमच्यासोबत येतो. उद्योग परत आणू. पण मिंध्या गट नुसता शेपटी घालून होय महाराजा असे म्हणतो. मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला जातात. कितीदा दिल्लीत जाऊन झुकता. वेदांताला केंद्र सरकार सवलती देत आहे. हा कट आहे, महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातेत न्यायचा आणि सवलती द्यायच्या.

  भाई और बहनो असे सभेत म्हणणारे कुठे होते
  उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनेने अनेकांना आधार दिला. प्राण वाचवणाऱ्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या पत्नीला नोकरी दिली. मी आज एक पत्र दिले आहे. मुंबईवर जेव्हा हल्ला झाला त्यावेळी शिवसैनिकांनी एनएसजी कमांडोसाठी चहा पाणी आणि मदत केली. मदत करताना हरीश नावाचा शिवसैनिक अतिरेक्यांच्या गोळीत मृत्यूमुखी पडला. चार शिवसैनिक जखमी झाले होते. आम्ही लढवय्ये आहोत. भाई और बहनो असे सभेत म्हणणारे कुठे होते. भाजपवाले अशावेळी कुठे असतात, असा सवाल त्यांनी केला.

  आम्ही झुकणारे नाही
  ठाकरे म्हणाले, शिवसैनिक आणि मुंबईचे नाते का दृढ आहे, तर ते रक्तदान, संकटात मदतीची जेव्हा गरज असते तेव्हा ते शिवसैनिक पुढे सरसावतो त्यामुळे. आमचे नाते अथांग आहे. भाजपवाले म्हणतात आमचे ठरले काय ठरले? मुंबईला पिळणार आणि दिल्लीश्वरांसमोर झुकवणार आम्ही झुकणारे नाही.