
यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळ ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत, अनिल देसाई, विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेतेही उपस्थित होते
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray Death Anniversary) यांचा आज अकरावा स्मतीदिन आहे. त्यांच्या स्मृतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्कवर (Shivaji Park) अनेक नेते, शिवसैनिक दाखल होत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनींही शिवतिर्थावर जाऊन बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहिली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.
शिवसेनेचे प्रमुख नेतेही उपस्थित
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मतिदिनानिमित्त आज शिवाजी पार्क येथील त्यांच्या स्मृतिस्थळी खास फुलांची सजावट करण्यात आली आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून या शिवतिर्थावर शिवसैनिकांची रिघ लागली आहे. बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून अनेक नेते, शिवसौनिक शिवतिर्थावर येत आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळ ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत, अनिल देसाई, विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेतेही उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील शिवसैनिकांनी स्मृतीस्थळी जाऊन आदरांजली वाहिली. गेल्या वर्षी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षनेतृत्वाविरुद्ध बंडखोरी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे (एमव्हीए) सरकार पडल्यानंतर मूळ शिवसेना दोन गटात विभागली गेली.
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे आणि सौ. रश्मीवहिनी ठाकरे ह्यांनी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या स्मृतिदिना निमित्त शिवतीर्थावरील स्मृतीस्थळावर अभिवादन केले. pic.twitter.com/IoTDfJhyUu
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) November 17, 2023