सर्वोच्च न्यायालय कोणत्या प्रकारचा निर्णय घेईल याचं प्रमेय आपल्याला मांडता येणार नाही – उज्ज्वल निकम

आजच्या निकालात सर्वोच्च न्यायालय हे डिटेल्स मध्ये जाणार नाही असे मला वाटत पक्षाची घटना हा त्या पक्षाचा आत्मा असतो.

    उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया : महाराष्ट्राच्या आजच्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीवर ज्येष्ठविधीत्न उज्वल निकम माध्यमांशी बोलताना त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेने बाबत जो निर्णय दिला आहे या निर्णयाबाबत हा निर्णय कायद्याच्या कसोटीत योग्य की अयोग्य हे तपासले जाणार आहे. घटनेनुसार निवडणूक आयोगाचा हा निर्णय अंतिम असतो या निर्णयात काही उनिवा जर असल्या तर याबाबत सर्वोच्च न्यायालय हा निर्णय घेऊ शकतो. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या बाबतीत जे निरक्षण नोंदवले आहेत. सर्वोच्च न्यायालय अशा प्रकारचा निर्णय घेईल तशा प्रकारचा असं प्रमेय आपल्याला मांडता येणार नाही असे उज्ज्वल निकम यांनी सांगितले.

    पुढे उज्ज्वल निकम म्हणाले, निवडणूक आयोग पुढच्या त्या कसोट्या होत्या त्या वेगळ्या धर्तीवर होत्या. ज्या राजकीय पक्षाच्या घटना त्यात निवडून आलेले पदाधिकारी बहुमत कोणाकडे आहे. त्या राजकीय पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले लोकप्रतिनिधी शिवसेना या राजकीय पक्षाची घटना पक्षाचे बलाबल तपासले जाईल. आजच्या निकालात सर्वोच्च न्यायालय हे डिटेल्स मध्ये जाणार नाही असे मला वाटत पक्षाची घटना हा त्या पक्षाचा आत्मा असतो. त्या पक्षाच्या घटनेनुसार सर्वोच्च न्यायालय ही बाब तपासेल की निवडणूक आयोगाच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करने जरूरीचे आहे की नाही हे सांगेल ते उज्ज्वल निकम म्हणाले.