ते अपक्ष आहे की नाही याचा निर्णय कोर्टाला घ्यावा लागणार – कायदेतज्ञ उल्हास बापट

जे संविधानात स्पष्ट लिहिलं आहे, त्याचा अर्थ लावण्याचा प्रश्नच येत नाही. पण संविधानात काही स्पष्ट नसेल तर त्याचा अर्थ लावावा लागतो. संविधाना सभेतील चर्चेचा आधार घ्यावा लागतो. असेही ते म्हणाले.

    मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सवोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. तब्बल अडीच तास चाललेल्या या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केला. त्यांनतर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) या प्रकरणावर उद्या सुनावणी करण्यात सांगितलं आहे. याबाबत ज्येष्ठ कायदेतज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी प्रतिक्रिया दिली असून शिंदे गटाने (Eknath Shinde) अजूनही कोणत्याही पक्षात स्वत:ला विलीन करून घेतलेलं नाही. त्यामुळे ते अपक्ष आहे की नाही याचा निर्णय कोर्टाला घ्यावा लागणार आहे. हा पक्ष बाहेर पडला आणि विलिनीकरण झालं नाही तर सर्व चाळीस जण अपात्र ठरतील, असं उल्हास बापट यांनी सांगितलं.

    गेल्या अनेक दिवसापासून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेना शिंदे गट, उद्धव ठाकरे गटाकडून जोरदार युक्तीवाद झाला. सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले आणि उद्या पुन्हा या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याचं सांगितलं. याबाबत बोलताना ज्येष्ठ कायदेतज्ञ उल्हास बापट म्हणाले की,दोन तृतियांश लोक गेले तर ते वाचू शकतात. पण यावेळी मर्जर शब्द वापरला गेलाय. राज्यघटनेत मर्जर शब्द वापरलेला आहे. शिंदे गटाने (Eknath Shinde) अजूनही कोणत्याही पक्षात स्वत:ला विलीन करून घेतलेलं नाही. त्यामुळे ते अपक्ष आहे की नाही याचा निर्णय कोर्टाला घ्यावा लागणार आहे. हा पक्ष बाहेर पडला आणि विलिनीकरण झालं नाही तर सर्व चाळीस जण अपात्र ठरतील.

    संविधानाचा अर्थ लावण्याच्या दोन पद्धती असतात एक म्हणजे संविधानात जे लिहिलंय ते जसंच्या तसं स्वीकारलं जातं. जे संविधानात स्पष्ट लिहिलं आहे, त्याचा अर्थ लावण्याचा प्रश्नच येत नाही. पण संविधानात काही स्पष्ट नसेल तर त्याचा अर्थ लावावा लागतो. संविधाना सभेतील चर्चेचा आधार घ्यावा लागतो. या प्रकरणात संविधानात मर्जर हा शब्द वापरला गेला आहे. त्यामुळे वेगळा अर्थ लावता येणार नाही. त्यामुळे कोर्टाला निर्णय घेणं अधिक सोपं जाणार आहे, असं उल्हास बापट यांनी सांगितलं.