शिवसेना बंडखोर आमदारांना अल्टिमेटम, संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बैठकीला हजर व्हा, अन्यथा कारवाईचा इशारा

राज्यात आता राजकीय घडामोडींना वेग आला असून, आता शिवसेना (Shivsena party) विधिमंडळ पक्ष कार्यालयाकडून एक प्रसिद्धीपत्रक बंडखोर आमदाराला (MLA) पाठवण्यात आले आहे. त्या पत्रात संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत मुंबईत बैठकीला हजर व्हा, अन्यथा कारवाई होईल असा इशारा देण्यात आला आहे. बंडखोर आमदारांना अल्टिमेटम (Ultimatum to MLA’s from shivsnea ) दिला आहे. आज शिवसेनेकडून सायंकाळी ५ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे.

    मुंबई : विधानपरिषद निवडणुकीत (MLC Election 2022) मविआच्या पराभवानंतर मविआमध्ये (MVA) मोठी अस्थिरता निर्माण झाली असून, मविआ बरखास्त होऊन सरकार कोसळणार का? अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राज्यातील राजकीय हालचालीना वेग आला आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) काल सुरतमध्ये (Surat) जवळपास 30 आमदार (MLA) संपर्कात होते. आज या संख्येत भर पडली असून, 40 आमदार संपर्कात असल्याचं बोललं जात आहे, शिंदेसह सर्व आमदार आता गुवाहटी (Guwahati ) येथे आहेत. मंगळवारच्या मध्यरात्रीनंतर शिवसेनेचे बंडखोर आमदार स्पाइसजेटच्या विमानातून गुवाहाटीकडे रवाना झालेत.

    दरम्यान, राज्यात आता राजकीय घडामोडींना वेग आला असून, आता शिवसेना (Shivsena party) विधिमंडळ पक्ष कार्यालयाकडून एक प्रसिद्धीपत्रक बंडखोर आमदाराला (MLA) पाठवण्यात आले आहे. त्या पत्रात संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत मुंबईत बैठकीला हजर व्हा, अन्यथा कारवाई होईल असा इशारा देण्यात आला आहे. बंडखोर आमदारांना अल्टिमेटम (Ultimatum to MLA’s from shivsnea ) दिला आहे. आज शिवसेनेकडून सायंकाळी ५ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. (Shivsen meeting 5.00pm in Mumbai)

    आज सायंकाळी ५ वाजता शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आहे. (Shivsen meeting 5.00pm in Mumbai) या बैठकीला हजर न राहिल्यास पक्षाकडून कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. (Ultimatum to MLA’s from shivsnea ) जर या बैठकीला हजर राहिले नाही तर शिवसेना पक्षाच्या सदस्यत्व (Membership) सोडण्याचा तुमचा विचार आहे, असं समजलं जाईल, असं या पत्रकात (Letter) म्हटलं आहे. त्यामुळे पाच वाजताच्या बैठकीत कोण-कोण उपस्थित राहणार याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, सुत्रांच्या माहितीनुसार बंडखोर आमदार संध्याकाळी मुंबईत बैठकीला येणार नसल्याची माहिती समोर येत आहे.