umesh kolhe murder case update accused dr yusuf khan murder case national investigation agency claim in sessions court nrvb

भाजप नेत्या नुपूर शर्मा यांना वक्तव्याचे समर्थन करणाऱ्या कोल्हे यांच्या समाजमाध्यमांवरील मेसेजमुळे संतप्त झालेला खान, त्याचा स्क्रीनशॉट घेतला आणि तो 'कलीम इब्राहिम' व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकला ज्यामध्ये सहआरोपी इरफान खान ॲडमिन आहे तसेच भडकावणारा मजकूरही फॉरवर्ड केला. त्यानंतर शर्मा यांना लक्ष्य करण्यासाठी तरूणांना प्रवृत्त केले

मयुर फडके, मुंबई : अमरावती (Amravati) येथील व्यावसायिक उमेश कोल्हेच्या हत्येप्रकरणी (Businessman Umesh Kolhe Murder Case) अटकेत असलेल्या आरोपी पशुवैद्यकीय डॉक्टर युसुफ खान (Doctor Yusuf Khan) हाच हत्याकांडाचा कर्ताकरविता होता असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) बुधवारी जामीनाला विरोध करताना केला आहे.

भाजप नेत्या नुपूर शर्मा यांना वक्तव्याचे समर्थन करणाऱ्या कोल्हे यांच्या समाजमाध्यमांवरील मेसेजमुळे संतप्त झालेला खान, त्याचा स्क्रीनशॉट घेतला आणि तो ‘कलीम इब्राहिम’ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकला ज्यामध्ये सहआरोपी इरफान खान ॲडमिन आहे तसेच भडकावणारा मजकूरही फॉरवर्ड केला. त्यानंतर शर्मा यांना लक्ष्य करण्यासाठी तरूणांना प्रवृत्त केले, आरोपी प्रेषित पैगंबरांच्या अपमानाचा सूड घेण्याचा प्रयत्न करत होते, कारण, युसूफ खाननेही हाच मेसेच अनेकांना पाठवला त्यातच आणखी एका सहआरोपी अतीब रशीदशी संपर्क साधला आणि त्याला कोल्हेचा बदला घेण्यासाठी प्रवृत्त केले, असा दावाही एनआयएने खान याच्या जामीनाला विरोध करताना केला आहे.

मात्र आपल्याविरोधात कोणताही पुरावा नसतानाही सहआरोपी म्हणून या खटल्यात उभे केल्याचा दावा युसुफ खानने याचिकेत केला आहे. खान बरेलवी स्कूल ऑफ थॉटचे अनुसरण करणारा कट्टर सुन्नी मुस्लिम असून “तबलीगी जमात” चा सदस्य नाही. एनआयएच्या आरोपपत्रात या आरोपाला पुष्टी देण्यासाठी कोणतेही दस्तऐवज, पुरावे नाहीत किंवा कोणत्याही साक्षीदाराने खानवर आरोप केलेला नाही. त्यामुळे यूएपीए किंवा आयपीसीच्या तरतुदी लागू करण्यासाठी तसेच खानचा (कोल्हेची) हत्या करण्यामागील हेतू सिद्ध करण्यास एनआयएला यश आलेले नाही, असेही जामीन अर्जात नमूद करण्यात आले आहे.