नाशिकमध्ये अघोषित पाणीबाणी, हंडाभर पाण्यासाठीर महिलांची कसरत

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी टंचाई निर्माण होते. पुण्यानंतर आता नाशिकमध्ये अनेक भागात अघोषित पाणीबाणी करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

    उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी टंचाई निर्माण होते. पुण्यानंतर आता नाशिकमध्ये अनेक भागात अघोषित पाणीबाणी करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.राज्यभरात उन्हाळा ऋतूला नुकतीच सुरुवात झाली आहे. दरवर्षी उन्हाळ्यात राज्यातील सगळ्याच भागांमध्ये कमी पाणीपुरवठा केला जातो. नाशिकमधील पंचवटीतील टकलेनगर, कृष्णनगर, गणेशवाडी, सहजीवननगर, दातेनगरसह म्हसरूळ परिसरातील बोरगड, किशोर सूर्यवंशी मार्ग, पुष्पकनगर या परिसरांमध्ये अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा सुरु आहे. कमी पाणीपुरवठा होत असल्याने परिसरातील विद्युत मोटारी सुरु झाल्यानंतर लगेच बंद होत आहेत.

    नाशिमधील पंचवटी भागात खूप कमी दाबाने पाणीपुवठा केला जात आहे, अशी तक्रार पंचवटीमधील महिलांनी केली आहे. नाशिक महापालिकेकडून विद्युत मोटारी जप्त करण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी दिले होते. मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. शहरात मोठ्या प्रमाणात विद्युत मोटारीद्वारे पाणी खेचले जाते. त्यामुळे ज्यांच्याकडे मोटारी आहेत, त्यांच्याकडे मोठा पाणीसाठा आहे. पण त्याच्या घरा शेजारी असलेल्या नागरिकांकडे एक हंडा देखील पाणी नसल्याचे चित्र दिसून आले आहे. नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी अर्धा अर्धा तास वाट पाहावी लागत आहे. पावसाळा सुरु होण्यास अजून तीन महिने शिल्लक असताना नाशिकमध्ये पाण्यासाठी संघर्ष निर्माण झाला आहे.

    पावसाळ्याच्या आधी पाण्याची ही परिस्थिती असल्याने महिला वर्गाला पुढील दिवसांची काळजी लागली आहे. गंगापुर धरणातील पाणी कमी झाल्यानंतर नाशिकमधील नागरिकांना मोठ्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे उपलब्ध असलेले पाणी नागरिकांनी जपून वापरावे असे आव्हान करण्यात आले आहे. तसेच महापालिकेने दिलेल्या नियमांनुसार, कोणीही पाण्याचा दुरुपयोग केला तर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेल्या पाणपोईवर कोण नसताना नळ चालू ठेवल्याचे चित्र दिसून आले आहे.

    नाशिक शहरातील गावठाण भागामध्ये दिवसातून दिन वेळा पाणी येते. दुपारी येणारे येणारे पाणी हे खूप कमी दाबाने येत असल्याने महिलांना सकाळी लवकर येणारे पाणी भरावे लागत आहे. गावठाण भागात सकाळी ४.३० वाजल्यापासून पाणी भरण्यासाठी महिलांना उठावे लागत आहे. तसेच सकाळी उठल्यानंतर पाणी मिळेल की नाही याची शाश्वती नसल्याने महिलांनी सांगितले आहे.