unauthorized tap connections in all wards of kdmc action was taken against as many as 133 unauthorized tap connections on thursday nrvb

ही कारवाई पाणी पुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे व किरण वाघमारे यांच्या अधिपत्त्याखाली सर्व प्रभागातील उप अभियंता, कनिष्ठ अभियंता, प्रभागांचे सहा.आयुक्त, प्लंबर व इतर कर्मचारी यांच्या सहकार्याने करण्यात आली.

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका (KDMC) आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे (Commissioner Dr Bhausaheb Dangde), अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे (Additional Commissioner Mangesh Chitale) यांनी दिलेल्या सक्त निर्देशानुसार महापालिकेच्या सर्वच प्रभागांत (Wards) गुरुवारी अनाधिकृत नळजोडण्यावर (unauthorized tap connections) तोडक कारवाई करण्याची धडक मोहिम प्रभागक्षेत्र अधिकारी यांनी राबविली .

“अ” प्रभागात बल्याणी परिसरातील एकूण अर्धा इंची १७ नळजोडण्या (१ अनिवासी व १६ निवासी) खंडीत करण्यात आल्या. “ब” प्रभागात‍ उंबर्डे परिसरातील अर्धा इंची ५ अनाधिकृत नळ जोडणी खंडीत करण्याची कारवाई करण्यात आली. तसेच “क” प्रभागातील देवानंद भोईर चाळ, चंदनशिवेनगर या परिसरातील अर्धा इंची २१ अनाधिकृत नळ जोडणी खंडीत करण्याची धडक कारवाई करण्यात आली. “जे” प्रभागात‍ अशोकनगर , वालधुनी या परिसरात अर्धा इंची १३ अनाधिकृत नळ जोडणी खंडीत करण्याची कारवाई करण्यात आली. “ड” प्रभागात‍ काटेमानिवली या परिसरात अर्धा इंच ५ अनाधिकृत व १ इंच ५ अनाधिकृत नळ जोडणी खंडीत करण्याची कारवाई करण्यात आली. तसेच “फ” प्रभागात खंबाळपाडा, कांचनगाव या परिसरात १ इंची १० व अर्धा इंच २ अशी एकूण १२ अनाधिकृत नळ जोडणी खंडीत करण्याची कारवाई करण्यात आली.

“ह” प्रभागातील पूर्ण परिसरात १ इंची एकूण १५ अनाधिकृत नळ जोडणी खंडीत करण्यात आल्या तसेच ट्युलिप बिल्डिंग या इमारतीवर अनाधिकृत नळ जोडणीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “ग” प्रभागात‍ नेरूरकर रोड, म्हात्रे नगर, आयरेगाव या परिसरात अर्धा इंच ५ व १ इंच ७ अशी एकूण १२ अनाधिकृत नळ जोडण्या खंडीत करण्यात आल्या “९आय” प्रभागात‍ गोळवली, पिसवली या परिसरात एकूण २२ अनाधिकृत नळ जोडणी खंडीत करण्याची कारवाई करण्यात आली, तसेच “आय” प्रभागातील १४ वाणिज्य आस्थापनांवर अनधिकृत नळ जोडणी संदर्भात गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता किरण वाघमारे यांनी दिली. त्याचप्रमाणे “ई” प्रभागात देखील नांदिवली, भोपर व देसलेपाडा या परिसरात ६ पाऊण इंच अनधिकृत नळ जोडणींवर कारवाई करण्यात आली.

ही कारवाई पाणी पुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे व किरण वाघमारे यांच्या अधिपत्त्याखाली सर्व प्रभागातील उप अभियंता, कनिष्ठ अभियंता, प्रभागांचे सहा.आयुक्त, प्लंबर व इतर कर्मचारी यांच्या सहकार्याने करण्यात आली.

महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी दिलेल्या निर्देशानुसार सदर कार्यवाही यापुढेही सुरु राहणार असल्याची‍ माहिती पाणी पुरवठा विभागामार्फत देण्यात आली.