Uncle's death at his nephew's wedding, grief at the joyous occasion

सर्व नातेवाईक, आप्त व मित्रमंडळी वाद्यवृंदाच्या तालावर थिरकत होते. वरात वधू मंडपी पोहोचणार तेवढ्यातच शिवशंकर साठवणे यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी प्रकृती बरी वाटत नसल्याचे कुटुंबीयांना सांगितले. त्यांना साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात नेत असतांनाच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. लग्नाच्या आंनद क्षणातच शोक व दु:खात बदलला.

    मोहाडी : मृत्यू माणसाला कधी, कुठे, केव्हा आणि कसा गाठेल याचा नेम नाही. सकाळी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने पुतण्याच्या लग्नासाठी गेलेल्या काकांचा वरात वधूमंडपी जात असताना अचानक प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाला. त्यामुळे, होणारा विवाह अगदी साधेपणाने आटोपण्यात आला. आनंद, उत्साहाचा वातावरण शोकसभेत परावर्तीत झाल. शिवशंकर साठवणे (रा. करडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक होते.

    करडी येथील पंकज विरेन्द्र साठवणे याचा विवाह ३ मे रोजी परसोडी (ता.) साकोली येथे सकाळी १२ वाजता होता. या लग्नात सहभागी होण्यासाठी वराकडील सर्वमंडळी मोठ्या खुशीत परसोडी येथे पोहोचली. लग्नाची तयारी सुरू झाली. लग्नाच्या पूर्वीच्या सर्व विधी व संस्कारात वराचे काका शिवशंकर साठवणे यांनी सहभाग घेतला. जानवसा स्थळावरून लग्नाची वरात वधूमंडपी रवाना झाली. सारे नातेवाईक, आप्त व मित्रमंडळी वाद्यवृंदा च्या तालावर थिरकत होते. वरात वधू मंडपी पोहोचणार तेवढ्यातच शिवशंकर साठवणे यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी प्रकृती बरी वाटत नसल्याचे कुटुंबीयांना सांगितले. त्यांना लगेच साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात नेत असतांनाच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. लग्नाच्या आंनद क्षणातच शोक व दु:खात बदलला.

    उष्माघाताची शक्यता
    सध्या तापमानाचा पारा जोरावर असून सूर्य जणू काही आग ओकू लागला आहे. सकाळी दहा वाजतापासून अंग पोळून काढणारे ऊन पडत आहे. मध्यान्हाच्या सुमारास तर बाहेर पडायची सोय नाही. अशा उष्णतेची लाट असलेल्या वातावरणात तरी लग्न सकाळच्या वेळेत आटोपणे, वरात भर उन्हात न काढणे याची काळजी लग्नघरच्या लोकांनी घ्यायला हवी. या प्रकारामुळे उष्माघाताने मृत्यूच्या घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.