खाकी वर्दीतली माणुसकी अधोरेखीत ; वाहतूक पोलिसामुळे अपघातातील जखमीला मिळाले जिवदान

इचलकरंजी येथील विवेकानंद कॉलनी येथील एक वयोवृद्ध दाम्पत्य नागाव येथील आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. दरम्यान नागावहून दादासो सय्यद यांच्या रिक्षातून परतत असताना वृद्ध गृहस्थ तोल जाऊन चालत्या रिक्षातून खाली कोसळले.

    हातकणंगले : खाकी वर्दीतल्या माणुसकीचे दर्शन आपल्याला कित्येक वेळा अनुभवायला मिळते. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रिद वाक्य घेऊन स्वताचा कुंटूंबाची किंबहूना जिवाचीही परवा न करता जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या खाकी वर्दीतील माणुसकीची अशीच एक घटना दोन दिवसांपूर्वी पहायला मिळाली. हातकणंगले पोलीस ठाणे हद्दीतली अतिग्रे ते इचलकरंजी मार्गावरील पुलावर नव्वदी गाठलेले एक वयस्कर इसम चालत्या वाहनातून खाली पडले. वाहनाचे चाक त्यांच्या पायावरून गेल्यामुळे रक्तस्त्राव होत होता. जखमीला रुग्णालयात नेण्यासाठी संबंधित रिक्षा चालक मदत मागत होता, मात्र मदतीसाठी कोणीही येत नव्हते. मात्र देव माणसाप्रमाने हातकणंगले पोलीस ठाण्याचे अंमलदार स्वप्नील जयसिंग मोहीते हे धावून आलेत. त्यांच्या मुळेच एका वयोवृद्ध इसमाचे प्राण वाचले. त्यांनी केलेल्या मदतीमुळे पुन्हा एकदा खाकी वर्दीतली माणुसकीचे दर्शन झाले.

    घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, इचलकरंजी येथील विवेकानंद कॉलनी येथील एक वयोवृद्ध दाम्पत्य नागाव येथील आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. दरम्यान नागावहून दादासो सय्यद यांच्या रिक्षातून परतत असताना वृद्ध गृहस्थ तोल जाऊन चालत्या रिक्षातून खाली कोसळले. त्यांच्या पायास गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमानात रक्तस्त्राव झाला. रिक्षा चालक येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांकडून मदत मागत होते पण कुणीच मदतीला पुढे आले नाही. दरम्यान याची खबर वाहतुक अंमलदार स्वप्नील मोहीते यांना दिली. क्षणाचाही विचार न करता मोहीते स्वतः घटनास्थळी दाखल झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वयोवृद्धास इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालय दाखल केले. वेळेत उपचार झाल्याने संबंधित वयोवृद्ध इसमाची तब्येत सुधारल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. खाकी वर्दीतल्या तत्परतेने आज एकाचे प्राण वाचल्याने पुन्हा एकदा खाकीतली माणुसकी अधोरेखीत झाली आहे. या कार्यतत्परतेमुळे हातकणंगले पोलीस ठाण्याचे कर्मचारी स्वप्नील मोहीते यांचे कौतुक होत आहे.