बापू पंडित सेवा सोसायटीवर सत्ताधाऱ्यांचे निर्विवाद वर्चस्व; सर्वच जागांवर विजय

चिपरी (ता.शिरोळ) येथील बापू पंडित विविध कार्यकारी सेवा संस्थेसाठी शुक्रवारी मतदान झाले. अतिशय चुरशीने झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी शाहू आघाडीने निर्विवाद वर्चस्व राखत सर्व १३ जागांवर मोठ्या मताधिक्क्याने विजय संपादन केला.

    जयसिंगपूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : चिपरी (ता.शिरोळ) येथील बापू पंडित विविध कार्यकारी सेवा संस्थेसाठी शुक्रवारी मतदान झाले. अतिशय चुरशीने झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी शाहू आघाडीने निर्विवाद वर्चस्व राखत सर्व १३ जागांवर मोठ्या मताधिक्क्याने विजय संपादन केला.

    सत्ताधारी आघाडीचे नेतृत्व सुदर्शन पाटील, बबन यादव, भाऊसो शेळके, रमेश रजपूत, रावसाहेब भोसले, दिलीप भानुसे यांनी केले. दरम्यान, ग्रामविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख अभयकुमार पाटील यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले. निकालानंतर आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. विजयी उमेदवारांचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी अभिनंदन केले.

    विजयी उमेदवार असे

    सुदर्शन पाटील, रमेश रजपूत, तातोबा कोरे, नरसगोंडा पाटील, सुभाष मगदूम, सुधीर लोहार, महावीर मगदूम, सचिन पाटील, मनोहर पोवार, नेताजी भोसले, सविता पाटील, सुवर्णा मजलेकर, सुभाष पांडव आदी आहेत.