संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

राज्यात शासकीय, निमशासकीय कर्मचारी यांचा जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी संप (Government Employee on Strike) सुरू आहे. या संपाचा आज तिसरा दिवस आहे. पण तरीही यावर अद्याप तोडगा निघाला नाही.

कोल्हापूर : राज्यात शासकीय, निमशासकीय कर्मचारी यांचा जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी संप (Government Employee on Strike) सुरू आहे. या संपाचा आज तिसरा दिवस आहे. पण तरीही यावर अद्याप तोडगा निघाला नाही. यामुळे सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसत आहे. पण हजारो बेरोजगार तरुण-तरूणींचा शुक्रवारी कोल्हापुरात (March in Kolhapur) भव्य मोर्चा निघणार आहे.

कोल्हापुरात सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात सुशिक्षित बेरोजगारांमध्ये चांगलाच रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे कोल्हापुरात सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात धडक मोर्चाचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाची पोस्ट व्हायरल होत आहे. व्हायरल पोस्टमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, पोलिसांकडे या मोर्चासाठी परवानगी मागण्यात आली नसल्याची माहिती दिली जात आहे. याबाबतचे पत्रक सध्या व्हायरल होत आहे.

काय आहे पत्रकात?

जुनी पेन्शन थांबवा, देश वाचवा असा नारा सुशिक्षित बेरोजगारांनी दिला आहे. संपकरी कर्मचाऱ्यांच्या जागेवर आम्ही अर्ध्या वेतनामध्ये आणि तेही विनापेन्शन काम करण्यास तयार आहोत, असे सांगण्यात आले आहे. जुनी पेन्शन योजना थांबवून, राज्याला मोठ्या आर्थिक संकटातून वाचवण्याची हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जुनी पेन्शन योजना बंद करण्यासंदर्भात निवेदन देण्यात येणार आहे. हे निवेदन देण्यासाठी बेरोजगार युवक-युवतींनी मोठ्या प्रमाणात मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आले आहे.