Unfortunate death of a 4-year-old child in a collision with a speeding dumper

तनिषाला आळंदीतील प्रियदर्शनी शाळेतून (Priyadarshini School) तिचे आजोबा किसन थोरवे हे दुचाकीहून घरी घेऊन जात होते. दरम्यान वडगाव रस्त्यावरील गोशाळेसमोर दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या भरधाव डंपरने जोरात धडक दिली. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने तनिषाला मोठी दुखापत होऊन मृत्यू झाला. तर तिचे आजोबा किसन थोरवे यांच्या डोक्याला, हाताला, पोटाला, कमरेला मार लागून ते जखमी झाले आहेत.

    पिंपरी : आळंदी येथील वडगांव (Vadgaon) रस्त्यावर चार वर्षाची चिमुकली शाळेतून तिच्या आजोबांसोबत दुचाकीवरून घरी जात असताना भरधाव डंपरने त्यांना धडक (Damperane hit) दिली. या अपघातात चार वर्षीय (4 Year Girl) चिमुकलीचा मृत्यू (Death)  झाला आहे. तनिषा ऊर्फ परी विशाल थोरवे (वय ४ रा. चऱ्होली खुर्द, थोरवेवस्ती ता. खेड जि. पुणे) असे मृत पावलेल्या चिमुकलीचे नाव आहे.

    आळंदी पोलिसांनी (Alandi Police) दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास वडगांव रस्त्यावरील गो शाळेजवळ घडली. तनिषा ऊर्फ परी विशाल थोरवे असे मृत पावलेल्या चिमुकलीचे नाव आहे. तर आजोबा किसन एकनाथ थोरवे यांना गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी डंपर चालक संतोष जामिरुद्दीन माल (सध्या राहणार शिर्के कंपनीजवळ, हनुमानवाडी केळगाव ता. खेड जि. पुणे) याच्यावर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत किसन एकनाथ थोरवे (वय ६५ रा. चऱ्होली खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीला आळंदी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    याबाबतची माहिती अशी की, तनिषाला आळंदीतील प्रियदर्शनी शाळेतून (Priyadarshini School) तिचे आजोबा किसन थोरवे हे दुचाकीहून घरी घेऊन जात होते. दरम्यान वडगाव रस्त्यावरील गोशाळेसमोर दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या भरधाव डंपरने जोरात धडक दिली. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने तनिषाला मोठी दुखापत होऊन मृत्यू झाला. तर तिचे आजोबा किसन थोरवे यांच्या डोक्याला, हाताला, पोटाला, कमरेला मार लागून ते जखमी झाले आहेत. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळा हून पळून जात होता. मात्र, स्थानिक तरुणांनी पाठलाग करून त्यास पकडले. या दहा दिवसांच्या आत आळंदीतील अपघातात मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे. १८ जुलै रोजी आळंदीतील वारकरी संप्रदायातील तरुण विद्यार्थ्यांचा वडगांव चौकात मृत्यू झाला होता. त्यामुळे आळंदी व चऱ्होली खुर्द या गावात शोककळा पसरली आहे.