अंगावर वीज पडून बाप लोकाचा दुर्दैवी मृत्यू, चाळीसगाव तालुक्यातील न्हावे येथील घटना

पावसाची रिमझिम सुरु झाल्यानंतर शेतात पिकाला खत देण्यासाठी गेलेल्या बापलेकांच्या अंगावर अचानक वीज कोसळली. या दुर्घटनेत बापलेकाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे न्हावे गावावर शोककळा पसरली आहे.

    चाळीसगाव – तालुक्यातील न्हावे येथे आज दुपारी विजांचा कडकडासह जोरदार पाऊस सुरू असतांना विज पडून बाप लेकाचा दुर्देवी मृत्यू झाला. एकीकडे राज्यात सर्वत्र गणपती बाप्पाला निरोप देत असतांना दुसरीकडे अंनत चतुर्दशीच्या दिवशी तालुक्यातील न्हावे गावात अंगावर वीज पडून मुलासह बापाचा मृत्यू झाल्याने तालुक्यात एकच हळहळ व्यक्त होत आहे.

    पावसाची रिमझिम सुरु झाल्यानंतर शेतात पिकाला खत देण्यासाठी गेलेल्या बापलेकांच्या अंगावर अचानक वीज कोसळली. या दुर्घटनेत बापलेकाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे न्हावे गावावर शोककळा पसरली आहे. आबा शिवाजी चव्हाण हे न्हावे येथे कुटुंबासह वास्तव्याला होते. त्यांची न्हावे शिवारात शेती आहे. शेतात यंदा त्यांनी कापसाची लागवड केली होती. आज पावसाचे वातावरण असल्यामुळे सकाळी आबा चव्हाण, पत्नी व मुलगा दीपक आबा चव्हाण हे शेतातील कापसाला खत घालण्यासाठी गेले असता दुपारी २ वाजेच्या सुमारास पावसाची रिमझिम सुरु झाली नंतर विजांच्या कडकडाटासह पावसाला जोरदार सुरवात झाली. पावसापासून बचाव व्हावा यासाठी तिघेजणे शेतातल्या शेवगाच्या झाडाखाली उभे असताना अचानक वीज कोसळली. या घटनेत आबा चव्हाण आणि त्यांचा मुलगा दिपक आबा चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत आबा चव्हाण यांची पत्नी व दीपक चव्हाण याची आई सुदैवाने बचावल्या आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होतं आहे.