दुर्दैवी घटना! ठाण्यात लिफ्ट कोसळून 7 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

४० मजली इमारतीच्या छतावर वॉटर प्रुफिंगचं काम सुरू होतं. लिफ्टचा दोर तुटल्याने लिफ्ट घरी परतणाऱ्या कामगारांच्या अंगावर कोसळली. ही घटना  रविवारी सांयकाळची आहे. बचाव पथकाने लिफ्टमध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले. घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शींनी बाळकुम अग्निशमन दलाला कळवली.

    ठाणे : ठाण्यातून (Thane) एक दुर्दैवी बातमी समोर येत आहे. ठाण्यात एक दुर्दैवी व धक्कादायक दुर्घटना घडली आहे. ठाण्यातील बाळकुम परिसरात आयरीन या इमारतीचे बांधकाम पूर्ण होत आले. या ४० मजली इमारतीच्या छतावर वॉटर प्रूफिंगचे काम सुरू होते. पण अचानक लिफ्टचा (Lift) दोर तुटल्याने सात कामगार मुत्यूमुखी पडले असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे काम संपवून कामगार खाली येत होते. तेवढ्यात ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत घरी परतणाऱ्या कामगारांवर काळाने घाला घातला. त्यामुळं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (unfortunate death of six workers due to elevator collapse in thane a seriously injured)

    नेमकं काय घडलं?

    दरम्यान, ४० मजली इमारतीच्या छतावर वॉटर प्रुफिंगचं काम सुरू होतं. लिफ्टचा दोर तुटल्याने लिफ्ट घरी परतणाऱ्या कामगारांच्या अंगावर कोसळली. ही घटना  रविवारी सांयकाळची आहे. बचाव पथकाने लिफ्टमध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले. घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शींनी बाळकुम अग्निशमन दलाला कळवली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. ही दुर्घटना नेमकी कशी घडली याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. लिफ्ट का कोसळली याचा तपास आता पोलीस करतील. त्यानंतर कामगारांचा मृत्यू का झाला. याला जबाबदार कोण, हे समोर येईल.

    विकासकावर गुन्हा नोंदवणार?

    घा घटनेनंतर परिसरात हळहळ व शोक व्यक्त होत आहे. तर विकासकाच्या हलगर्जीपणामुळं व इजिनियरच्या गलथान कारभारमुळं सात जणांना आपला जीव गमवावा लागला. असा सूर नागरिकांचा आहे. त्यामुळं विकासकावर गुन्हा नोंद व्हावा, अशी मागणी होत आहे.