दुर्दैवी घटना ! बैलगाडा शर्यतीत जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू

भोरमध्ये जनाईदेवी आणि रामनवमीच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीवेळी एका जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

    भोर : भोरमध्ये जनाईदेवी आणि रामनवमीच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान बैलगाडा शर्यत सुरू असताना एक बैलगाडा एका ज्येष्ठ नागरिकाच्या अंगावर गेल्याने सदर व्यक्तीच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाली. त्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

    जखमी व्यक्ती उपचारासाठी पुणे येथील खाजगी रुग्णालयात नेले असता दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही दुर्घटना सोमवारी (दि.१५) सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान घडली विष्णू गेनबा भोमे (वय ६५, रा. शिंद, ता.भोर) असे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

    भोरची ग्रामदेवता जनाईदेवी आणि रामनवमीच्या उत्सवानिमित्त सोमवारी एसटी स्टँडजवळील नवलाई माता मंदिराच्या समोरील शेतामध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. सेमीफायनलची बैलगाडा शर्यत सुरू असताना बैलगाडा गर्दीत घुसला. विष्णू भोमे यांच्या डोक्याला आणि छातीला दुखापत झाली. त्यांना त्वरित पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते परंतु मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.