कल्याण पश्चिमेत कुत्र्याला नागाने दंश केल्याने कुत्र्याच्या मुत्यूची दुर्दैवी घटना

गरमीमुळे नागरी वस्त्यांमधील लाँनच्या थंडगार पारटेक्स लादीच्या प्रगांणात गारव्यासाठी साप आढळल्याच्या घटना वाढु लागल्या आहेत.

    कल्याण : कल्याणमध्ये गेली आठवड्यापासून रात्री कधी थंड हवामान तर कधी गरम हवामान असे सुरू आहे. गरमीमुळे नागरी वस्त्यांमधील लाँनच्या थंडगार पारटेक्स लादीच्या प्रगांणात गारव्यासाठी साप आढळल्याच्या घटना वाढु लागल्या आहेत. कल्याण पश्चिमेतील गोदरेज हिल परिसरातील स्वप्न नगरी बिल्डिंगच्या मागील बाजूस लाँन लगत असलेल्या पारटेक्स लादीच्या प्रगंण असलेल्या भागात साडेचार फुटी कोब्रा प्रजातीच्या विषारी नागाने घराच्या गेट लगत राँक्ट विकर जातीच्या कुत्र्याला दंश केल्याची घटना आहार.

    ही घटना शुक्रवारी रात्री साडे अकाराच्या सुमारास घडल्याचे म्युँथ्यूज यांनी पाहिले असता कुत्रा मृत पावला होता. नागाला पाहून त्याच्या सह उपस्थितांची भितिने धादंल उडाली. म्युँथ्यूज यांनी तातडीने सर्पमित्र दत्ता बोंबे यांच्या शी संपर्क साधला घटनास्थळी तातडीने सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी पोहचत साडेचार फुटी कोब्रा नागाला पकडून जीवदान दिल्याचे पाहता उपस्थितीतांनी सुटकेचा निश्वास टाकला. ” सर्पमित्र दत्ता बोंबे यांच्या शी संपर्क साधला वन अधिकारी यांच्या देखरेखीखाली कोब्रा प्रजातीच्या नागास जंगलात निसर्गातील मुक्त वातावरणात सोडले असल्याचे सांगितले.”