
महाबळेश्वर येथील ढग संशोधन प्रयोगशाळेस केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी सकाळी भेट देऊन तेथे होत असलेल्या संशोधनाची माहिती घेतली यावेळी डॉ जी पंडीथूरल जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले यावेळी शास्त्रज्ञ सुनिल सोनबावणे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव तहसीलदार तेजस्विनी पाटील पालिकेचे आबाजी ढोबळे आदी उपस्थित होते.
महाबळेश्वर : महाबळेश्वर येथील ढग संशोधन प्रयोगशाळेस केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी सकाळी भेट देऊन तेथे होत असलेल्या संशोधनाची माहिती घेतली यावेळी डॉ जी पंडीथूरल जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले यावेळी शास्त्रज्ञ सुनिल सोनबावणे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव तहसीलदार तेजस्विनी पाटील पालिकेचे आबाजी ढोबळे आदी उपस्थित होते.
ढगांवर संशोधन करण्यासाठी महाबळेश्वर येथील उंच ठिकाणी ही प्रयोगशाळा बांधण्यात आली आहे या प्रयोग शाळेतील काम व येथील संशोधन करणारे शास्त्रज्ञ यांना येणार अडचणी यांची सविस्तर माहीती त्यांनी घेतली या प्रयोगशाळांमधील देशी व परदेशी उपकरणाची सविस्तर माहिती देखील त्यांनी घेतली यावेळी हवामान विभागात काम करणाऱ्या विविध विभागाच्या शास्त्रज्ञांनी तेथे होत असलेल्या संशोधनाबाबतची माहिती देताना ढग,ढगांचे प्रकार ढगांची उंची,घनता,आकारमान त्यातल्या बाष्पाचे प्रमाण, ढगांची दिशा, थेंबांची संख्या आदी निरीक्षणे येथे नोंदवली जातात तसेच यासाठी रडार, व्हिडिओ कॅमेरे, सेन्सर्स आदींचा समावेश असलेली संगणकीकृत यंत्रणा येथे असून साठ किलोमीटर परिघातील ढगांचा वेध घेण्याची क्षमता येथील रडारांमध्ये असल्याची माहिती शास्त्रज्ञ डॉ पंडीथूरल सेलेनटलेर यांनी दिली.
शास्त्रज्ञांसमवेत बैठक –
ढग संशोधन केंद्राची पाहणी केल्यानंतर केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांच्या अध्यक्षतेखाली शास्त्रज्ञांची महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीस शास्त्रज्ञ डॉ जी सेलेनटलेर जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी पोलीस अधीक्षक समीर शेख आदीसह विविध विभागांचे वरिष्ठ शास्त्रज्ञ उपस्थित होते या बैठकीनंतर ढग संशोधन परिसरात पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच मेरी माती मेरा देश उपक्रमांतर्गत रिजिजू याना झाडाचे रोप देण्यात आले.