केंद्रीय मंत्री भारती पवारांनी स्मार्ट सिटीला सुनावले; रस्त्यांच्या नावाखाली खड्डेच खड्डे

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत स्मार्ट सिटीला नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत सुनावले. त्या यावेळी म्हणाल्या, सद्यस्थितीत राज्यात अपघातांचे प्रमाण जास्त असून ग्रामीण भागात तुलनेने जास्त प्रमाण आहे. त्यातही दुचाकी अपघातांचे प्रमाण जास्त आहेत.

    नाशिक – गेल्या काही वर्षांपासून नाशिक (Nashik) शहरात स्मार्ट सिटी (Smart City) काम करते आहे. मात्र, झालेल्या रस्त्यांवर अनेक खड्डे (Pothole) पडले असून नागरिकांना सुरळीत वाहतूक मिळण्यासाठी आणि वाहतूक कोंडी सुटण्यासाठी स्मार्ट सिटीने तात्काळ पाऊले उचलणे आवश्यक असल्याचे मत केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार (Bharati Pawar) यांनी व्यक्त केले.

    केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात (Nashik Collector) बैठकीत स्मार्ट सिटीला नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत सुनावले. त्या यावेळी म्हणाल्या, सद्यस्थितीत राज्यात अपघातांचे प्रमाण जास्त असून ग्रामीण भागात तुलनेने जास्त प्रमाण आहे. त्यातही दुचाकी अपघातांचे प्रमाण जास्त आहेत. शिवाय नाशिक शहरात काही सिग्नल बंद आहे, ते या आठवड्यात सुरू होतील. काही ठिकाणी अद्यापही ब्लॅक स्पॉट असून यांचा आढावा घेऊन ब्लॅक स्पॉट कमी करण्याबाबत चर्चा सुरु असल्याचे डॉ. भारती पवार यांनी सांगितले.

    सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड कॉरिडॉर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग असून या प्रकल्पाचे काम वेगाने होणे गरजेचे आहे. या महामार्गाचा १२२ किमीचा मार्ग नाशिक जिल्ह्यातून जात असून या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांना भूसंपादनच्या बदल्यात योग्य मोबदला मिळेल. इतर राज्यांना जोडणारा हा चांगला प्रकल्प आहे. या प्रकल्पातून कनेक्टिव्हिटी वाढणार, रिपोर्ट आल्यानुसार मोबदला ठरवता येईल, प्रत्येक जागेनुसार रेट ठरवता ठरवला जाईल, असेही त्यांनी आश्वासन दिले.