केंद्रीय मंत्री कपील पाटील यांचे आमदार विश्वनाथ भोईर यांना आवाहन

मंत्री पाटील यांनी आपसातील वाद आणि मतभेद विसरुन चांगल्या कामासाठी सगळ्यांनी एकत्रित यावे असा संदेश विश्वनाथ भोईर यांना दिला आहे.

    आगरी कोळी भवनाच्या भूमीपूजन कार्यक्रम केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. मात्र या भवनाचा कार्यक्रम लवकर का घेता या प्रश्नावर स्थानिक शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर हे नाराज झाले आहेत. ते या कार्यक्रमास उपस्थित नसल्याने अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र मंत्री पाटील यांनी आपसातील वाद आणि मतभेद विसरुन चांगल्या कामासाठी सगळ्यांनी एकत्रित यावे असा संदेश विश्वनाथ भोईर यांना दिला आहे.

    कल्याण पश्चिमेतील खडकपाडा येथील एका ठिकाणी आगरी कोळी कुणबी भवन उभारले जाणार आहे. या भवनासाठी केंद्रीय पंचायत राज मंत्री कपील पाटील ७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या भवनाच्या भूमीपूजन मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आमदार गणपत गायकवाड, माजी आमदार प्रकाश भोईर, मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक अर्जून भोईर, भाजप शहराध्यक्ष वरुण पाटील, जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख सचिन बासरे, वंडार कारभारी, मनसेचे पदाधिकारी विनोद केणे, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर उपस्थित होते.

    कपिल पाटील यांनी आमदार विश्वनाथ भोर यांना दिला सल्ला
    या वेळी कार्यक्रमात स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर उपस्थित नसल्याने अनेक चर्चांना उधाण आले. कपील पाटील यानी सांगितले की, ससा आणि कासवाची स्पर्धा सोडून पुढे जा. समाजासाठी चांगले काम करा. हे भवन सर्व समाजासाठी उभे राहत आहे. यासाठी सगळ्यांनी काम केले पाहिजे.

    कार्यक्रमामध्ये आगरी कोळी कुणबी एकता महामंडळाचे अध्यक्ष अर्जून भोईर यांनी सांगितले की, लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता कधी लागू शकते. आचारसंहिता लागू झाल्यास फंड मिळणार नाही. त्यामुळे कार्यक्रम लवकर घेतला. ठाणे महापालिकेस गेलेला फंड आम्हाला उपलब्ध करुन दिला. त्यासाठी मंत्री कपील पाटील यांचे आभार मानतो. हे भवन सर्व समाजासाठी आहे.