मालकतत्वावर चालणारे पक्ष मोदींच्या विरोधात केंद्रिय मंत्री कपिल यांचे विधान, आमचे मालक राज ठाकरे यांच्याकडे फडणवीस शेलार समर्थनासाठी चप्पल घासतात, राजू पाटील यांचे प्रतिउत्तर

अंबरनाथ येथील भाजपच्या जाहीर सभेत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी विरोधकांना चोर उचक्के डाकू बलात्कारी अशी उपमा दिली. मोदी @9 अंतर्गत अंबरनाथमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नऊ वर्षात केलेला विकास कामाचा लेखाजोखा मांडला तसेच विरोधकांवर सडकून टीका केली.

    अंबरनाथ : काँग्रेस, (Congress) राष्ट्रवादी काँग्रेस, (NCP) शिवसेना, (Shivsena) मनसे आणि इतर पक्षाचे नाव घेत कपिल पाटील यांनी विरोधकांवर टीका केली. देश किंवा संविधान वाचवण्यासाठी एकत्र आले नाही स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी एकत्र आलेत अशी टीका केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी केली होती. या टीकेला मनसे आमदार राजू पाटील यांनी सडेतोड उत्तर दिलेय. आमच्या पक्षाचे मालक राज ठाकरे. फडणवीस शेलार समर्थनासाठी आमच्या मालकाकडे चप्पल घासतात. आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बिनशर्थ पाठिंबा दिला आणि राजकीय परिस्थितीचे भान भाजपाने ठेवावे हे अपेक्षित आहे असे म्हटले आहे. अंबरनाथ येथील भाजपच्या जाहीर सभेत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी विरोधकांना चोर उचक्के डाकू बलात्कारी अशी उपमा दिली. मोदी @9 अंतर्गत अंबरनाथमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नऊ वर्षात केलेला विकास कामाचा लेखाजोखा मांडला तसेच विरोधकांवर सडकून टीका केली.

    400 खासदार निवडणुकीत निवडून आणायचे

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील नऊ वर्षांत केलेल्या विकासकामांची माहिती देण्यासाठी मोदी@9 अंतर्गत राज्यभरात उपमुख्यमंत्री आणि मंत्री यांचे दौरे सभा सुरू झाल्यात. या पार्शवभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथ शहरात जाहीर सभा झाली.
    केंद्रीय राज्य पंचायत मंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, आमदार निरंजन डाखवरे, आमदार गणपत गायकवाड, आमदार किसन कथोरे, आमदार कुमार आयलानी, माजी आमदार नरेंद्र पवार उपस्थित होते. यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण यांनी पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान बनवणार, कोरोनाकाळानंतर आपण जो श्वास घेतोय. ते फक्त नरेंद्र मोदी यांच्यामुळे घेतोय, देश महासत्तेकडे जाताना दिसतोय ते पण मोदींनमुळेच सांगितले. नरेंद्र मोदींना समर्थन देण्यासाठी या 9090902024 मोबाईल नंबरवर प्रत्येकाने मिसकॉल द्या आपल्याला 400 खासदार येत्या लोकसभा निवडणुकीत निवडून आणायचे आहेत असे आवाहन यावेळी रवींद्र चव्हाण यांनी केले.

    …तर समजायचं राजा योग्य दिशेने चालला आहे

    केंद्रिय राज्यमंत्री कपिल यांनी गेल्या नऊ वर्षात विकासाच्या दृष्टिकोनातून जी प्रगती झाली आहे ती प्रगती सर्व विरोधी पक्षांच्या डोळ्यात खुपसतेय आहे अशी टीका करत भाषणाला सुरुवात केली. पुढे बोलताना मंत्री पाटील यांनी विरोधी पक्षांना देश चालवायचा नाही, संविधान वाचवायचे नाही..हे सर्व पक्ष मालकी हक्काचे पक्ष काँग्रेस पासून शरद पवार, राज ठाकरे नितेशकुमार हे सर्व मालकी तत्त्वाचे पक्ष आहेत. पक्षाचे नाव घेऊन सर्व नेत्यांच्या उदाहरण त्यांनी दिला. हे सर्व स्वतःचे पक्ष वाचविण्यासाठी एकत्र आले आहेत, चोर, लुटरे एकत्र आले की समजायचं राजा योग्य दिशेने चालला आहे, तसं हे आहे, सगळे एकत्र आले आहे म्हणजे मोदी योग्य दिशेने चालले आहेत असा टोला विरोधकांना लगावला .

    आमच्या मालकांकडे फडणवीस-शेलार समर्थनासाठी चपला घासतात

    आमच्या पक्षाचे मालक राजसाहेब ठाकरे आहेत हे सत्यच आहे. परंतु तुमचा पक्ष मालकांचा आहे. याच आमच्या मालकांकडे फडणवीस, शेलार समर्थनासाठी शिवतीर्थावर आपल्या चपला घासतात. याचे भान सन्माननीय मंत्री महोदयांनी ठेवायला हवे. आम्ही हिंदूत्वाच्या मुद्द्यावर व विचारांवर या सरकारला बिनशर्त पाठींबा दिला आहे, आमचा मान व सध्याच्या राजकीय परिस्थितीचा भान भाजपाने ठेवावा हे अपेक्षित आहे. आम्ही जर विरोधात गेलो तर महाराष्ट्रात भाजपाची काय परिस्थिती होईल याचे चिंतन ‘त्यांनी’ करावे. असं मनसे आमदार राजू पाटील यांनी टोला लगावला.