
वेदांत देवकातने यूएसए येथील जाहिरात एजन्सीच्या कोडिंग स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. त्याने आपल्या कौशल्याच्या जोरावर ४१,००० डॉलर्स (प्रतिवर्ष ३३ लाख रूपये) वेतन असलेली नोकरी सुनिश्चित केली आहे. या स्पर्धेत जगभरातून १००० पेक्षा अधिक कोडर्सनी सहभाग नोंदविला होता. त्याच्या या कर्तृत्वाची दखल रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी घेतली आहे.
नागपूर : नागपूर येथील इयत्ता १० वी मध्ये शिकणाऱ्या वेदांत देवकातने (Vedanta Devakat) यूएसए (USA) येथील जाहिरात एजन्सीच्या कोडिंग (Advertising agency coding) स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. त्याने आपल्या आपल्या कौशल्याच्या जोरावर ४१,००० डॉलर्स (प्रतिवर्ष ३३ लाख रूपये) वेतन असलेली नोकरी सुनिश्चित केली आहे. या स्पर्धेत जगभरातून १००० पेक्षा अधिक कोडर्सनी (Coders) सहभाग नोंदविला होता. त्याच्या या कर्तृत्वाची दखल रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी घेतली आहे. त्यांनी त्यांच्या निवासस्थानी एक समारंभ घेऊन वेदांतचा सत्कार केला आहे. वेदांताचा वयाचा विचार करता कंपनीने वेदांतची ऑफर मागे घेऊन, त्याला आपले कौशल्य विकसित करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.
वेदांत हा नारायणा ई टेक्नो स्कूलमधील (Narayana E Techno School) विध्यार्थी आहे. या शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सुलक्षणा भुयार (Principal Dr. Sulakshana Bhuyar) यांनी देखील वेदांतसह संवाद साधण्याकरिता माननीय मंत्री यांचे आभार मानले. त्या म्हणाल्या, “गडकरीजींना भेटून आम्हाला आनंद झाला. त्यांनी आमचे अभिनंदन केले आणि वेदांतला त्याची आवड जोपासण्यासाठी प्रोत्साहन दिले. शाळेच्या वतीने वेदांतला त्यांच्या हस्ते लॅपटॉप भेट( laptop gift) देणे हाही आमच्यासाठी मोठा सन्मान होता. वेदांतने हे अतुलनीय यश संपादित केले हे मुख्याध्यापिका म्हणून माझ्यासाठी आणि नारायणाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप अभिमानास्पद आहे. नारायणामध्ये आम्ही आमच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्कृष्टता जोपासण्यास प्रोत्साहित करतो आणि वेदांत हे त्याचे एक चमकदार उदाहरण आहे. ”
वेदांत पुढे म्हणाला – कोडिंग ही माझी आवड आहे, या आधी मी माझ्या आईच्या जुन्या लॅपटॉपवर कोड करायला शिकलो. आता मी यात आणखी कौशल्य मिळवू शकतो. माझ्या शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे आणि आता नारायणा व्यवस्थापनाने मला पुढील शिक्षणासाठी एक साधन दिले आहे.”
वेदांत वडिल राजेश देवकाते म्हणाले की, नारायणा व्यवस्थापनाचा गेस्चर पाहून ते भावूक व आनंदित झाले आहेत. ते म्हणाले, ”वेदांतची शाळा व शिक्षकांनी नेहमीच त्याला पाठिंबा दिला आहे. आजपर्यंत आम्हाला चिंता भेडसावत होती की, लॅपटॉपमुळे वेदांतच्या अभ्यासावर परिणाम होईल, पण आता आम्ही त्यांना ही कौशल्ये अधिकाधिक शिकण्यास प्रेरित करू.” वेदांत त्याच्या नुकत्याच मिळालेल्या यशाने खूप आनंदित आहे आणि त्याची आवड अधिक जोमाने पुढे नेण्याची त्याची इच्छा आहे. त्याच्या पालकांच्या आणि शाळेच्या पाठिंब्याने तो हे ध्येय निश्चित पूर्ण करेल.