Union Minister Nitin Gadkari has been conferred the degree of Doctor of Science by Governor Koshyari

या कार्यक्रमात राज्यपाल तथा कुलपती (Governor and Chancellor) भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची विशेष उपस्थिती होती. विशेष म्हणजे या दीक्षांत समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते केंद्रीय रस्ते, वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांना 'डॉक्टर ऑफ सायन्स (Doctor of Science) ही मानद पदवी प्रदान (Honorary degree conferred ) करण्यात केली.

    अकोला : अकोला (Akola) येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या (Dr. Punjabrao Deshmukh Agricultural University) छत्तिसाव्या वार्षिक दीक्षांत समारंभात (Thirty-sixth Annual Convocation Ceremony) आज पार पडला. या कार्यक्रमात राज्यपाल तथा कुलपती (Governor and Chancellor) भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची विशेष उपस्थिती होती. विशेष म्हणजे या दीक्षांत समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते केंद्रीय रस्ते, वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स (Doctor of Science) ही मानद पदवी प्रदान (Honorary degree conferred ) करण्यात केली.

    या भव्य दिव्य  छत्तिसाव्या वार्षिक दीक्षांत समारंभात अनेक दिग्गजांनी आपली हजेरी लावली. तसेच, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मिळालेल्या  ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ या मानद पदवीचे साक्षीदार झाले. यावेळी माजी कुलगुरु डॉ मोतीलाल मदान, कुलगुरु डॉ विलास भाले, कुलसचिव, शिक्षक व स्नातक विद्यार्थी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी, राज्यपालांच्या हस्ते सुवर्ण पदके तसेच इतर पारितोषिके स्नातकांचा प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला.