ऊसामुळे आत्महत्या करण्याची वेळ येईल : नितीन गडकरी

वाढत्या ऊस उत्पादनावरुन केंद्रीयमंत्री नितीन गडकरींनी चिंता व्यक्त केली आहे. ऊसामुळे आत्महत्या करण्याची वेळ येईल, असा इशारा नितीन गडकरींनी दिला आहे.

    सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : वाढत्या ऊस उत्पादनावरुन केंद्रीयमंत्री नितीन गडकरींनी चिंता व्यक्त केली आहे. ऊसामुळे आत्महत्या करण्याची वेळ येईल, असे ते म्हणाले.

    सोलापूर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग लोकार्पण सोहळ्याप्रसंगी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी बोलत होते. सोलापूर जिल्हा हा एकेकाळी दुष्काळी होता. मात्र, आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले की २२ लाख ऊसाचा गाळप झाला. इतके जास्त प्रमाणात लागवड होत राहिली. तर एक दिवस आत्महत्या करावी लागेल हा माझा शब्द आठवणीत ठेवा, असे गडकरी म्हणाले.

    पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, साखर सरपल्स झाली आहे. काही दिवसापूर्वी माझ्याकडे ब्राझीलचे शिष्टमंडळ आले होते. त्यांच्याकडे दुष्काळ पडलाय म्हणून बबनराव आज तुमच्या चेहऱ्यावर हास्य आहे. पण जर ब्राझीलमध्ये साखर वाढली तर २२ रुपये साखरेचा भाव होईल. तुम्हाला उसाचे दर काही कमी करता येणार नाहीत, तुम्हाला राजकारण करायचे आहे. त्यामुळे काय करायचे बघा. ऊसाच्या सायरपपासून इथेनॉल निर्मिती करा, मला आनंद आहे की आपल्याकडे इथेनॉल निर्मिती होते. इथून पेट्रोल हद्दपार करा, असं ते म्हणाले. साखर घाट्यात जाणार आहे. त्यामुळे बगॅस वगैरेपासून हायड्रोजन निर्मित करायला सुरु करा.

    कारखानदारी नुकसानमध्ये जाणारी आहे. आपण साखर उत्पादनामध्ये जगात तिसऱ्या नंबर आहोत, असं गडकरी म्हणाले.