He went for a morning walk! Youth dies after being swept away by Sipna river bridge

नीरा नदीमधील होणारे प्रदुषण गंभीर बाब आहे,या बाबतीत कठोर कारवाई केली जाईल.नीरा नदीच्या प्रदूषणाच्या पाण्याचा प्रश्न आहे.लोकांनी सुधारावे, अन्यथा त्यांनी कारखाने बंद करायची तयारी ठेवावी,अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी निरा नदीचे प्रदुषण करणाऱ्या उद्योगांना इशारा दिला.

    बारामती : नीरा नदीमधील होणारे प्रदुषण गंभीर बाब आहे,या बाबतीत कठोर कारवाई केली जाईल.नीरा नदीच्या प्रदूषणाच्या पाण्याचा प्रश्न आहे.लोकांनी सुधारावे, अन्यथा त्यांनी कारखाने बंद करायची तयारी ठेवावी,अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी निरा नदीचे प्रदुषण करणाऱ्या उद्योगांना इशारा दिला.

    सोमवारपासुन (दि ५) केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल दोन दिवसीय बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौ-यात सायंकाळी पटेल यांनी सोनगांव येथील सोनेश्वराचे दर्शन घेतले.तसेच निरा नदीची पाहणी केली.यावेळी नीरा नदीत बारामती तालुक्यातील दोन्ही सहकारी साखर कारखाने, तसेच फलटण तालुक्यातील कत्तल खाण्याचे दूषित पाणी हे नीरा नदीत सोडल्याचा आरोप नदीकाठच्या ग्रामस्थांनी केला.तसेच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.या पार्श्वभुमीवर पटेल बारामती तालुक्यातील निरावागज येथे गावभेट दौ-यात बोलताना कडक कारवाई करण्याचा इशारा दिला.

    यावेळी केंद्रीय राज्यमंत्री पटेल म्हणाले,नदीतील पाण्याचा तपासणी अहवाल सात दिवसात येईल.नदीत दूषित पाणी सोडल्याने पंजाब मधून कॅन्सर ट्रेन सुरु झाली. नदीत दूषित पाणी जावू नये यासाठी प्रयत्न करावे लागतील.नदीचे सगळ्यात नुकसान कत्तलखान्यामुळे झाले आहे. त्यामुळे प्रदुषणाबाबत कारवाई कशी केली जाईल ,हे सांगू शकत नाही.पण संकेत मात्र देऊ शकतो,असे पटेल म्हणाले.

    देशात आणि राज्यात परिवर्तनाची लाट आहे .पण ती आपल्याकडे का येत नाही यसाठी प्रयत्न सुरू आहेत.नदीचे पाणी दूषित झाले आहे. त्यावर पटेल साहेब मार्ग काढतील, मी बोलल्या नंतर अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर झाले. तुमच्या आमच्या मनातील हे सरकार आहे.बारामती मेडिकल कॉलेजला अहिल्याबाई होळकर यांचे नाव दिले. पण बारामती वाल्यांनी अभिनंदन केलं नाही, याचा खेद वाटतो. मनात आणि ध्यानात असावं लागते तेव्हा ओठावर येतो,असा टोला शिंदे यांनी लगावला.

    आमदार राम शिंदे