चंद्रपुरात पेट्रोलियम रिफायनरी स्थापन करणार, केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा

या पार्श्वभुमीवर ते तीन दिवस या लोकसभा क्षेत्राला भेट देणार आहेत. दरम्यान, कोकणातील रिफायनरी प्रकल्प रखडल्याबाबत त्यांनी नाराजीही व्यक्त केली.

    चंद्रपूर : चंद्रपूरसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. चंद्रपुरात पेट्रोलियम रिफायनरी प्रकल्प सुरु करणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी (Hardeep Singh Puri ) यांनी केली आहे. 20 मिलियन मेट्रिक टन क्षमतेची ही रिफायनरी असल्याचही त्यांनी सांगितलं.

    2024 मधील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने हरदीप सिंह पुरी यांची भाजपकडून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात लोकसभेच्या भाजपने गमावलेल्या जागा पुन्हा खेचून आणण्यासाठी पक्षाच्या वतीने विशेष अभियान राबविण्यात येत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत राजकीय स्थिती अनुकूल असताना भाजपने चंद्रपूरची जागा गमावली होती. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात राज्यात एकाच ठिकाणी काँग्रेसला यश मिळाले होते. या पार्श्वभुमीवर ते तीन दिवस या लोकसभा क्षेत्राला भेट देणार आहेत. दरम्यान, कोकणातील रिफायनरी प्रकल्प रखडल्याबाबत त्यांनी नाराजीही व्यक्त केली.