‘या’ वयातही शिकण्याची दुर्दम्य इच्छा! आजी-नातीच्या प्रेरणादायी फोटोची केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून दखल

लहानपणी शाळेत नाव दाखल करूनही दारिद्र्यामुळे आणि दोन लहान भावंडांचा सांभाळ करण्यासाठी लगेचच शाळा सोडून द्यावी लागल्याने निरक्षर राहिलेल्या बारामती येथील ७२ वर्षीय सुशीला क्षीरसागर आपल्या नातीकडून नवभारत साक्षरता अभियानानिमित्त अक्षरे गिरवू लागल्या आहेत. मणक्याच्या आजाराने त्रस्त असतानाही शिकण्याची दुर्दम्य इच्छा त्यांच्यात आहे. असाक्षर आणि त्यांना शिकवू इच्छिणाऱ्या स्वयंसेवकांसाठी प्रेरणादायी असलेल्या त्यांच्या छायाचित्राची केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दखल घेतली आहे.

  बारामती: लहानपणी शाळेत नाव दाखल करूनही दारिद्र्यामुळे आणि दोन लहान भावंडांचा सांभाळ करण्यासाठी लगेचच शाळा सोडून द्यावी लागल्याने निरक्षर राहिलेल्या बारामती येथील ७२ वर्षीय सुशीला क्षीरसागर आपल्या नातीकडून नवभारत साक्षरता अभियानानिमित्त अक्षरे गिरवू लागल्या आहेत. मणक्याच्या आजाराने त्रस्त असतानाही शिकण्याची दुर्दम्य इच्छा त्यांच्यात आहे. असाक्षर आणि त्यांना शिकवू इच्छिणाऱ्या स्वयंसेवकांसाठी प्रेरणादायी असलेल्या त्यांच्या छायाचित्राची केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दखल घेतली आहे. केंद्रीय सचिव संजय कुमार आणि अवर सचिव प्रदीप हेडाऊ यांनी याची प्रशंसा तर केलीच,तसेच नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या ‘उल्लास’ या फेसबुक पेजवर हे छायाचित्र पोस्टही केले आहे.

  देशभरात मागील वर्षापासून नव भारत साक्षरता अभियान ‘ सर्वांसाठी शिक्षण ‘ या नावाने सुरू झाले आहे. महाराष्ट्रात त्याची सुरुवात चालू वर्षी ८ सप्टेंबर रोजी जागतिक साक्षरता दिनी करण्यात आली. पंधरा वर्षे व त्याहून अधिक वयाच्या निरक्षरांच्या साक्षरतेसाठी सन २०२७ पर्यंत कालबद्ध कार्यक्रम केंद्र शासनाने राज्यांच्या मदतीने राबवणे सुरू केले आहे. मागील वर्षी महाराष्ट्रात हा कार्यक्रम विविध कारणामुळे राबवण्यात आला नव्हता.

  केंद्र शासनाने ‘शाळा’ हे एकक ठरवून स्वयंसेवकांच्या मदतीने प्रौढ निरीक्षरांना साक्षर करण्यासाठी नवभारत साक्षरता कार्यक्रम सुरू केला आहे. महाराष्ट्रात सन २०११ च्या जनगणनेनुसार १ कोटी ६३ लाख निरक्षर आहेत. चालू वर्षी राज्याला मागील वर्षीच्या उद्दिष्टासह बारा लाख चाळीस हजार निरक्षरांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट मिळाले आहे. या बाबतच्या सविस्तर सूचना योजना शिक्षण संचालक डॉ महेश पालकर यांनी दिल्या आहेत. त्यानुसार राज्यभर गावोगावी साक्षरतेचे वर्ग कमी-अधिक संख्येने सुरू झाले आहेत. त्यापूर्वीच सुशीला आजीचे मूलभूत शिक्षण त्यांची नात रुचिता हिने सुरू केले.

  राज्यातील उपक्रमाच्या प्रारंभाची छायाचित्रे व तपशील योजना संचालनालयाने केंद्र शासनास सादर केली होती. सातारा येथील ७६ वर्षीय बबई मस्कर महिलेचे साक्षरता वर्गातील पहिल्या दिवसाचे छायाचित्र आणि या दोघी आजींनातींचे छायाचित्र यासह अनेक छायाचित्रे व माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला पाठवण्यात आली होती.यातील दोन्ही छायाचित्रांची दखल केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने घेतली आहे.
  या वयातही शिकण्याची दुर्दम्य इच्छा!

  आजी-नातीच्या प्रेरणादायी फोटोची केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून दखल
  बारामती: नवराष्ट्र न्यूज नेटवर्क , लहानपणी शाळेत नाव दाखल करूनही दारिद्र्यामुळे आणि दोन लहान भावंडांचा सांभाळ करण्यासाठी लगेचच शाळा सोडून द्यावी लागल्याने निरक्षर राहिलेल्या बारामती येथील ७२ वर्षीय सुशीला क्षीरसागर आपल्या नातीकडून नवभारत साक्षरता अभियानानिमित्त अक्षरे गिरवू लागल्या आहेत. मणक्याच्या आजाराने त्रस्त असतानाही शिकण्याची दुर्दम्य इच्छा त्यांच्यात आहे. असाक्षर आणि त्यांना शिकवू इच्छिणाऱ्या स्वयंसेवकांसाठी प्रेरणादायी असलेल्या त्यांच्या छायाचित्राची केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दखल घेतली आहे. केंद्रीय सचिव संजय कुमार आणि अवर सचिव प्रदीप हेडाऊ यांनी याची प्रशंसा तर केलीच,तसेच नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या ‘उल्लास’ या फेसबुक पेजवर हे छायाचित्र पोस्टही केले आहे.